Taimur Diet Plan: बाहेरचे काहीही खाण्यास मनाई; करीना स्वतः बनवते तैमुरचा डायट प्लॅन, पहा कोणत्या गोष्टींचा असतो समावेश
Taimur Ali Khan (Photo Credits: Yogen Shah)

सध्या बॉलिवूड स्टार्ससोबत त्यांच्या मुलांचीही चलती आहे. आजकाल जवळजवळ प्रत्येक स्टारकीड कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असते. यामध्ये सर्वात आघाडीवर आहे पतौडी खानदानचा नवाब तैमुर अली खान (Taimur Ali Khan). करीना कपूर आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा मुलगा तैमुर जन्मतःच प्रसिद्धीचे वलय घेऊन जन्माला आला. आज त्याच्या हसण्या पासून ते बोलण्यापर्यंत सर्व गोष्टींचा बातम्या बनतात. अशीच तैमुरच्या एका महत्वाच्या गोष्टीची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत ती म्हणजे तैमुरचा डायट प्लॅन (Diet Plan)

होत तैमुरही आपल्या आईप्रमाणे डायट करतो. करीना त्याला कोणत्याही पार्टीमध्ये काहीच खाऊ देत नाही ही गोष्ट पाहून तैमुर नक्की काय काय खात असावा याबाबत उत्सुकता निर्माण झाली. तैमुरचा डायट प्लॅन स्वतः करीना बनवते. त्याच्या आहारात घरी बनवलेल्या पदार्थांचा समावेश असतो उदा: खिचडी, इडली आणि डोसा. तैमुरचा डायट प्लॅन प्रत्येक महिन्याला बदलला जातो. तैमुरला बाहेरील कोणतीच गोष्ट खाण्यास मनाई आहे, मात्र त्याला चिप्स आवडत असल्याने करीना त्याला ते थोड्या फार प्रमाणात खाऊ घालते. (हेही वाचा: सारखे फोटो काढणे थांबवा! तैमूर आंधळा होईल, विमानतळावर सैफ अली खान फोटोग्राफर्सवर भडकला)

प्रत्येक महिन्यात तैमुरच्या आवडीनुसार डायटमध्ये बदल केला जातो. शक्यतो जी फळे आणि भाज्या त्याला आवडतात त्यांचाच आहारात समावेश असतो. त्याला पालक साग आवडत नाही मात्र ते पौष्टिक असल्याने करीनाने त्याला ते खाऊ घालण्यास सुरवात केली आहे. दरम्यान स्टारकिड्स पैकी तैमुर हा सर्वात लोकप्रिय किड आहे. त्याच्या रूपातील बाहुल्याही बाजारात आलेल्या आहेत. सध्या त्याचा एक फोटो 1 हजार ते दीड हजारांना विकला जातो.