सारखे फोटो काढणे थांबवा! तैमूर आंधळा होईल, विमानतळावर सैफ अली खान फोटोग्राफर्सवर भडकला
Taimur Ali Khan and Saif Ali Khan (Photo Credits-Instagram/Viral Bhayani)

बॉलिवूड स्टार करीना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा मुलगा तैमूर (Taimur) ह्याचे फोटो काढण्यासाठी आणि पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक असतात. तसेच तैमूरच्या लहानसहान गोष्टीसुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायर होत असून त्याला प्रेक्षकांकडून खुप पसंदी मिळते. तसेच सैफ आणि करीना फोटोग्राफर्सना तैमूरचे फोटो काढण्यापासून कधीच रोखत नाही.

नुकतेच करीना आणि सैफ विमानतळावर एकत्र दिसून आले होते. त्यावेळी सैफ ह्याच्या खांद्यावर तैमूर सुद्धा बसलेला दिसून आला. विमानतळावर पोहचताच फोटोग्राफर्सनी यांचे फोटो काढण्यास सुरुवात केली. खासकरुन सर्वांचे लक्ष तैमूरकडे आकर्षित झाल्याने त्याच्याकडे कॅमेरे वळलेले दिसून आले. परंतु सैफ त्यावेळी फोटोग्राफर्सवर भडकला आणि आता बस्स करा फोटो काढणे. तैमूर अशाने आंधळा होईल असा संताप व्यक्त करत पुढे निघुन जाताना दिसला.(हेही वाचा-तैमूर अली खानच्या एका फोटोची किंमत तब्बल 'इतके' रुपये, सैफ अली खानचा खुलासा)

 

View this post on Instagram

 

😊❤️❤️❤️ #taimuralikhan #saifalikhan #kareenakapoorkhan off to Pataudi #airportdiaries @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

पण त्यानंतर फोटोग्राफर्सनी सैफ आणि करीना ह्या दोघांना फोटो काढण्यासाठी थांबण्यास सांगितले. तेव्हासुद्धा सैफने आम्ही थांबणार नाही तुम्हाला फोटो काढायचे असल्यास तर काढा अशा शब्दात उत्तर दिले.