तैमूर अली खानच्या एका फोटोची किंमत तब्बल 'इतके' रुपये, सैफ अली खानचा खुलासा
तैमूर अली खान (Photo Credits : Instagram)

तैमूर अली खान (Taimur Ali Khan) हा आता केवळ स्टार किड नव्हे तर इंटरनेटवर खास सेलिब्रिटी झाला आहे. पॅपराजी (paparazzi) आणि तैमूरचं एक खास नातं आहे. पूर्वी केवळ फोटो क्लिक करायला येणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधींकडे कौतुकाने पाहणारा तैमूर आता त्यांना हाक मारून ' हाय' आणि ' बाय' बोलायला शिकला आहे. इतक्या लहान वयातील तैमूरचा(taimur ali khan) हा खास अंदाज पाहून सैफ आणि करिनासह त्याचे चाहते देखील आवाक होतात. कॉफी विथ करणमध्ये (Koffee with Karan season 6) सारा अली खान (Sara Ali Khan)सोबत आलेल्या सैफने (Saif Ali Khan) तैमूरच्या या अंदाजाबद्दल सांगितलं आहे.

तैमूर अली खान मीडियाला फोटो देण्यासाठी उत्सुक असतो. सोशल मीडियामध्ये त्याच्या प्रत्येक नव्या फोटो आणि व्हिडीओसाठी सारेच उत्सुक असतात. सैफ अली खानच्या मते, तैमुरच्या एका फोटो क्लिकचे अंदाजे 1500 रुपये घेतले जातात. रणधीर कपूर यांनी ही माहिती दिल्याचेही त्याने कॉफी विथ करण चॅट शोमध्ये बोलताना सांगितले. मात्र करणच्या मते, तैमूरच्या फोटोचा रेट अधिक असण्याची शक्यता आहे. साऱ्या सेलिब्रिटींपेक्षा तैमूरच्या फोटोचा रेट अधिक असणार असे करण म्हणाला. सैफला तैमूरचे फोटो क्लिक करण्यावरून कोणताच थेट आक्षेप नाही. एका विशिष्ट मर्यादेमध्ये राहून भारतातील पॅपराजी फोटो क्लिक करतात असेही सैफ म्हणाला.

 

View this post on Instagram

 

👋 👋 hi 👋 👋 bye #taimuralikhan

A post shared by Taimur Ali Khan (@taimuralikhan_official_fanpage) on

काही दिवसांपूर्वी तैमूरला मीडियापासून लांब ठेवण्याचा कपूर आणि खान कुटुंबियातील वरिष्ठ लोकांचा सल्ला असल्याने तैमूरचे फोटो दिसणार नाहीत अशा बातम्या आल्या होत्या.