Ajith Kumar Admitted To Hospital: दाक्षिणात्य सुपरस्टार अजित कुमार रुग्णालयात दाखल; मॅनेजरने मेंदूच्या शस्त्रक्रियेबाबत दिले 'हे' अपडेट
Ajith Kumar (PC - Twitter)

Ajith Kumar Admitted To Hospital: दाक्षिणात्य सुपरस्टार अजित कुमार (Ajith Kumar) यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. साऊथचा सुपरस्टार अजित कुमार यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजित कुमार यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचे वृत्त समजल्यानंतर त्यांचे चाहते चिंताग्रस्त झाले आहेत. अजित कुमार यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. अभिनेत्यावर मेंदूची शस्त्रक्रिया झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, आता अजित कुमार यांच्या मॅनेजरने त्यांच्या आरोग्याची माहिती दिली आहे.

मॅनेजरने सांगितले की, अभिनेत्यावर कोणतीही शस्त्रक्रिया झालेली नाही. त्यांना नियमित आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजित कुमारचे व्यवस्थापक सुरेश चंद्र यांनी अभिनेत्याला ब्रेन ट्यूमर आणि ब्रेन सर्जरी झाल्याच्या बातम्यांचे खंडन केले आहे आणि ते पूर्णपणे खोटे असल्याचे म्हटले आहे. (वाचा - Vetri Duraisamy Death: तामिळ दिग्दर्शक वेत्री दुराईसामी यांचा अपघाती मृत्यू,चित्रपट क्षेत्रात खळबळ)

सुरेश चंद्र म्हणाले, ब्रेन ट्यूमर ऑपरेशनची बातमी खरी नाही. रुटीन चेकअपसाठी अजित कुमार यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तपासणीदरम्यान डॉक्टरांना त्याच्या कानाखालील नसा थोड्या कमकुवत असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर अर्ध्या तासात उपचार पूर्ण झाले. (वाचा - Aamir Khan Smokes Pipe During Instagram Live: आमिर खानने इंस्टाग्राम लाइव्ह दरम्यान केलं धुम्रपान; चाहत्याने अभिनेत्याला दिला 'असा' सल्ला)

आता अजित कुमार यांना जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. त्यांना 9 मार्च 2024 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो, अंसही सुरेश चंद्र यांनी म्हटलं आहे. अजित कुमार मगिझ थिरुमेनी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या 'विदा मुयार्ची' चित्रपटाचे शूटिंग करत आहेत.