
बॉलिवूड मधील अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही तिच्या अभिनयासोबत फॅशन ट्रेंडसाठी ओखळली जाते. तसेच सोनम नेहमी साध्या लूक पासून ते ग्लॅमर लूक पर्यंतचा तिचा पेहराव प्रत्येक वेळी परफेक्ट ठेवण्याचा प्रयत्न करते. तर सोनमने आता स्विमसूटमधील हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. परंतु नेटकऱ्यांनी तिला या फोटोवरुन ट्रोल केले आहे.
सोनमने नुकताच इन्स्टाग्रामवर पिवळ्या रंगातील स्विमसूटमधील हॉट फोटो पोस्ट केला आहे. तर सोनमचा हा स्विमसूट विंटेज पद्धतीचा आहे. त्याचसोबत फोटोसह उन्हाळ्याचे स्वागत असे खाली कॅप्शन दिले आहे. परंतु नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करत हा फोटो खुपच जास्त फोटोशॉप केला असल्याचे म्हटले आहे.(हेही वाचा-'दबंग 3' मधील सोनाक्षी सिन्हा हिचा लूक आऊट; पहा रज्जोची खास झलक (Photo)
View this post on Instagram

तर सोनमने पोस्ट केलेला फोटो हा फोटोशॉप असल्याचे म्हणत तिची मान, चेहरा आणि हात खुपच जास्त बारीक असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी ती दीपिका पादुकोण हिच्यासारखी दिसत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.