दोन दिवसांपूर्वीच 'दबंग 3' (Dabangg 3) या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली. 'दबंग' सिनेमाचे पूर्वीचे दोन्ही भाग चांगलेच गाजलेले असल्यामुळे 'दबंग 3' ची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. शूटिंगला सुरुवात होताच सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हिने सिनेमातील आपला खास लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'सलमान खान'ने दबंग 3 च्या शूटिंगला केली सुरूवात; पहा 'चुलबूल पांडे'ची पहिली झलक
दबंग 3 मधील रज्जोच्या भूमिकेतील आपली खास झलक शेअर करताना सोनाक्षीने लिहिले की, "दबंग 3 मधून रज्जो परत आली आहे. घरी आल्यासारखे वाटत आहे. आज माझा शूटिंगचा पहिला दिवस आहे आणि त्यासाठी मला शुभेच्छा द्या." Dabangg 3 मधून पुन्हा करिना कपूर झळकणार 'आयटम गर्ल'च्या अंदाजात
सोनाक्षी सिन्हा पोस्ट:
'दबंग 3' सिनेमाचे दिग्दर्शन प्रभुदेवा करत असून निर्मितीसुत्रं अरबाज खान सांभाळत आहे. 'दबंग 3' सोबतच सलमान खान 'भारत' सिनेमातही झळकणार आहे. तर सोनाक्षी सिन्हा हिचा 'कलंक' हा बहुचर्चित सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.