सलमान खान (Photo Credits: Instagram)

दबंगस्टार सलमान खानने 'भारत'(Bharat) सिनेमानंतर आता आजपासून 'दबंग 3' (Dabangg 3) च्या शूटिंगला सुरूवात केली आहे.  या सिनेमासाठी सलमान खान, अरबाज खान इंदौरमध्ये पोहचला आहे. आज या सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. त्याचा पहिला फोटो तरण आदर्शने ट्विटरवर शेअर केला आहे. अरबाज खान 'दबंग 3'चा निर्माता आहे तर दिग्दर्शकाच्या भूमिकेत प्रभुदेवा (Prabhu Deva) आहे.

तरण आदर्श ट्विट 

तरण आदर्श यांनी मुहूर्ताचा शॉट ट्विटरच्या माध्यामातून शेअर केला आहे. 'शुटिंग आजपासून सुरू, दबंग 3 मध्ये सलमान खान चुलबूल पांडेच्या रूपात आणि प्रभूदेवा करणार दिग्दर्शन असे लिहण्यात आले आहे.

सलमान खान

रविवारी रात्री सलमान खानने एक व्हिडिओ ट्विट करत 1 एप्रिलपासून 'दबंग 3' च्या शूटिंगला सुरूवात करत आहे. अशा आशयाचं ट्विट केलं होतं. यासाठी दबंग 3 ची टीम इंदौरला पोहचली आहे. इंदौर हे सलमान आणि अरबाजचं जन्मस्थान असल्याने दोघेही जुन्या आठवणीमध्ये रमले होते. दबंग 3 च्या शुटिंगला इंदौरमधीर महेश्वर ठिकाणाची निवड करण्यात आली आहे.

'दबंग 3' च्या सेट्सवर पहिला दिवस 

'दबंग'च्या पहिल्या दोन्ही भागांना रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. या सिनेमांनी बॉक्सऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे.