Dabangg 3 मधून पुन्हा करिना कपूर झळकणार 'आयटम गर्ल'च्या अंदाजात
करिना कपूर (फोटो सौजन्य-यु ट्युब)

सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याचा दबंग 2 मधून आपल्या ठुमक्यांनी प्रेक्षकांवर छाप पाडणारी अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) लवकरच दबंग 3 (Dabangg 3) च्या चित्रपटातून झळकणार आहे. तसेच 'फेविकॉल से' (Fevicol Se) गाणे सुपरहिट झाल्याने आता पुन्हा एका आयटम साँन्गमधून करिना दिसून येणार आहे. तर आयटम साँन्गचे दिग्दर्शन प्रभु देवा करणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, रोहित शेट्टी याच्यासोबत भेट झाल्यानंतर करिना अरबाज खान याला भेटण्यासाठी जूहू येथे गेली होती. तर अरबाज खान हा दबंग 3 चित्रपटाचा निर्माता आहे. दबंग चित्रपटाच्या पहिल्या भागात मलाइका अरोडा हिने 'मुन्नी बदनाम हुई' या गाण्यावर थिरकली होती. तर दुसऱ्या भागात करिनाने आयटम साँन्ग करत आता तिसऱ्या भागतही ती एका स्पेशल गाण्यावर थिरकताना दिसून येणार आहे.

डेक्कन क्रोनिकलने दिलेल्या रिपोर्टनुसार, अश्वनी मांजरेकर, सोनाक्षी सिन्हा आणि सलमान खान यांची या चित्रपटासाठी पूर्वीच निवड करण्यात आली होती. तर चित्रपटातील उर्वरित कलाकारांची निवड ही त्यांची भूमिका कोणती असणार आहे यावरुन करण्यात येणार आहे. तसेच येत्या मार्च महिन्यात या चित्रपटाचे शूटिंग सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे.