![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/05/Shahid-Kapoor-1-784x441-380x214.jpg)
बॉलिवूड कलाकार हे नेहमीच त्यांच्या कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरुन सोशल मीडियात ट्रोल होत असतात. असाच किस्सा बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) याच्या सोबत झाला असून त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.
शाहिदला मुंबईच्या विमानतळावर पाहिले गेले. त्यावेळी तो गाडीतून उतरुन पुन्हा गाडीत जात आपली बॅग नीट करत गाडीतून बाहेर पडला. परंतु घाईत असल्याने शाहीद गाडीचा दरवाजा बंद करण्यास विरुन गेल्याने सोशळ मीडियात काहींनी त्याला ट्रोल केले. तर काहींनी त्याच्या विरुद्ध संताप व्यक्त केला आहे.(कैटरीना कैफ हिने शेअर केला हॉट व्हिडिओ; सोशल मीडियात धुमाकूळ)
एका युजर्सने असे म्हटले आहे की, गाडीचा दरवाजा तरी बंद करुन पुढे जायचे होते. हे तर प्राथमिक मूल्य आहे. तर दुसऱ्या युजर्सने म्हटले आहे की, शाहिदला घमंड असून आलिशान आयुष्य हे काही काळापूर्तेच मर्यादित असते. अशा प्रकारच्या विविध प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी सोशल मीडियात व्यक्त केल्या आहेत.
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/05/Untitled-design-2019-05-11T132208.639.jpg)
शाहिदच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो 'कबीर सिंह' या आगामी चित्रपटातून झळकणार आहे. येत्या 13 मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांना सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. 'कबीर सिंह' हा चित्रपट 'अर्जून रेड्डी' या साऊथ चित्रपटाचा रिमेक आहे.