कैटरीना कैफ हिने शेअर केला हॉट व्हिडिओ; सोशल मीडियात धुमाकूळ
Katrina Kaif (Photo Credits: Instagram)

कैटरीना कैफ (Katrina Kaif) लवकरच सलमान खान (Salman Khan) सोबत 'भारत' (Bharat) सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात होणार असून आयपीएल 12 च्या फिनालेमध्ये देखील ही कैटरीना कैफ-सलमानची हॉट जोडी सिनेमाचे प्रमोशन करताना दिसणार आहे. याच दरम्यान कैटरीना कैफ हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात कैटरीना कैफचा हॉट आणि बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. (कैटरीना  कैफ हिच्या Yellow Swimsuit मधील हॉट फोटोमुळे चाहते घायाळ)

अलिकडेच कैटरीना कैफ हिने एले इंडियासाठी खास फोटोशूट केले असून याचा 'बिहाइंड द सीन्स' (Behind The Scenes) व्हिडिओ तिने शेअर केला आहे. यात कैटरीना कैफ वेगवेगळ्या अवतारात पाहायला मिळत आहे. कैटरीना कैफने व्हिडिओ शेअर केल्यानंतर 1 तासात व्हिडिओला 1 लाखाहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.

तुम्हीही पहा हा व्हिडिओ:

 

कैटरीना कैफ आणि सलमान खान शिवाय 'भारत' सिनेमात दिशा पटानी, तब्बू आणि सुनील ग्रोवर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. भारत हा 'ओड टू माय फादर' या कोरियन सिनेमाचा हा रिमेक आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित हा सिनेमा 5 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारत सिनेमाशिवाय कतरिना कैफ अक्षय कुमार याच्या 'सुर्यवंशी' सिनेमात झळकणार आहे.