संजय लीला भंसाली यांचा 'बैजू बावरा' मधून रणबीर कपूरची एक्झिट तर आता कार्तिक आर्यन करणार एन्ट्री?
Sanjay Leela Bhansali, Ranbir Kapoor and Kartik Aryaan (Photo Credits-Facebook)

बॉलिवूड मधील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भंसाली सध्या आपल्या अपकमिंग चित्रपट 'बैजू बावरा' (Baiju Bawra) च्या कथेवर काम करत आहेत. संजय लीला भंसाली यांना असे वाटते की, येत्या काळात त्यांचे अधिकाधिक सिनेमे बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करावी. याच कारणामुळे संजय लीला भंसाली यांनी आपला सिनेमा बैजू बावरा मधून रणबीर कपूर याला बाहेर केले आहे. बॉलिवूड हंगामाच्या बातमीनुसार, गेल्या काही दिवसांपासून रणबीर कपूर या सिनेमातील अभिनयासंदर्भात गोंधळात सापडला होता. ऐवढेच नव्हे तर रणबीर कपूर या सिनेमाबद्दल भंसाली यांच्या ऑफिसात सुद्धा येत होता.

याच दरम्यान कार्तिक आर्यनचे नाव या सिनेमासाठी समोर आले आहे. कार्तिक आर्यन गेल्या 1 वर्षापासून भंसाली यांना भेटत आहे. तर अभिनेत्री दीपिका पादुकोण सुद्धा या सिनेमाचा भाग असण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरु आहे. नुकत्याच रणबीर कपूर याने संजय लीला भंसाली यांची भेट घेत त्यांना या सिनेमाबद्दल मी खुप गोंधळात सापडल्याचे त्याने म्हटले होते. याच कारणामुळे आता संजय लीला भंसाली यांनी त्याला आपल्या सिनेमातून एक्झिट दाखवली आहे. या सिनेमासाठी रणबीर सोबत कोणताही बॉन्ड सुद्धा साइन करण्यात आलेला नव्हता.(Shershaah Release Date: सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी स्टारर 'शेरशाह' सिनेमा 'या' दिवशी होणार रिलीज; पहा सिनेमाचा टीझर)

भंसाली गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आपल्या ऑफिसमध्ये बैठक करत आहेत. तर त्यांच्या सिनेमासंदर्भात लवकरात लवकर काम सुरु व्हावे असे त्यांना वाटत आहे. सध्या भंसाली हे 'गंगूबाई काठियावाडी' साठी आलिया सोबत शुटिंग मध्ये व्यस्त आहेत. मात्र या शूटिंग नंतर लगेच पुढील सिनेमाचे शूटिंग त्यांना करायचे आहे. दुसऱ्या बाजूला आलिया भट्ट सध्या आपल्या फिटनेसवर खुप लक्ष केंद्रीत करत आहे. कारण तिला असे वाटते की, गंगूबाईच्या सिनेमांमधील गाण्यांमध्ये ती अधिक सुंदर दिसावी.