Shershaah Release Date: सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी स्टारर 'शेरशाह' सिनेमा 'या' दिवशी होणार रिलीज; पहा सिनेमाचा टीझर
Shershaah Movie Poster (Photo Credits: Instagram)

सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांनी आपल्या 'शेरशाह' (Shershaah) सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. स्वातंत्र्य दिन, वीरता, देशप्रेम आणि बलिदान यांची एक अविश्वसनीय कथा या सिनेमाद्वारे सादर करण्यात आली आहे. त्यामुळे सिनेमा रिलीजसाठी ऑगस्ट महिन्याची निवड अगदी योग्य ठरली आहे. 12 ऑगस्ट, 2021 रोजी हा सिनेमा अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ (Amazon Prime Video) वर प्रदर्शित होणार आहे.

सिद्धार्थ मल्होत्राने या सिनेमाचा टीझर इंस्टाग्रामवर शेअर करत या सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्याने लिहिले की, "हिरो त्यांच्या कथांमधून जिवंत राहतात. कारगीलचे बहादुर कॅप्टन विक्रम बत्रा यांची खरी वीरगाथा  तुमच्या समोर सादर करताना आम्हाला प्रचंड अभिमान वाटत आहे. माझ्यासाठी या सिनेमाचा प्रवास खूप मोठा होता आणि खऱ्या आयुष्यातील या व्यक्तीमत्त्वाची भूमिका साकारताना अभिमान वाटत आहे. शेरशाह अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर 12 ऑगस्ट रोजी रिलीज होईल." (Shershaah Poster Out: सिद्धार्थ मल्होत्राने आपल्या वाढदिवशी शेअर केले त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर्स)

पहा ट्रेलर:

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

या सिनेमाची निर्मिती धर्मा प्रोडक्शन आणि काश एंटरटेनमेंट ने केली असून विष्णू वर्धन यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. कारगिल युद्धाचे हिरो कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर हा सिनेमा बेतला आहे. यात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी प्रमुख भूमिकेत असून शिव पंडित, राज अर्जुन, प्रणय पचौरी, हिमांशु अशोक मल्होत्रा, निकितिन धीर, अंकिता गोराया, अनिल चरणजीत, साहिल वैद, शताफ फिगर आणि पवन चोप्रा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.