अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) याची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट 'ट्रॅप्ड' (Trapped) 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील राजकुमार राव याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 5 वर्ष झाल्यानंतर हा चित्रपटाचे निर्माता विक्रमादित्य मोटवाने (Vikramaditya Motwane) यांनी या चित्रपटाशी संबंधित एक मनोरंजक किस्सा सांगितला आहे. त्यांनी सोशल मिडियावर या चित्रपटातील एक फोटो शेअर करुन असे सांगितले आहे की 'राजकुमार या सीनमध्ये कंडोम चोकताना दाखवण्यात आला होता. मात्र हा सीन सेन्सर बोर्डाकडून काढून टाकला होता.'
विक्रमादित्य मोटवाने या सीनला इन्स्टाग्रामवर शेअर करुन सांगितले आहे की, सेन्सर बोर्डाने त्यांना हा सीन डिलीट करायला सांगितले होते. यावर त्यांनी सेंसर बोर्डाला प्रश्न विचारले असते बोर्डाने त्यांना यात राजकुमार कंडोम चाटताना दिसत आहे. त्यावर सेंसर बोर्डाने त्यांना विचारले त्यांनी असे का दाखवले. त्यावर मोटवाने यांनी त्यांना सांगितले होते की, या सीनमध्ये राजकुमार जवळ खाण्या-पिण्यासाठी काही नव्हते. आणि ते कंडोम स्ट्रॉबेरी फ्लेवरचे होते. मात्र सेन्सर बोर्डाला याचा अर्थ लागला नाही. त्यामुळे त्यांनी हा सीन काढून टाकण्यात आला. हेदेखील वाचा- Ranveer Singh New Film Cirkus: रणवीर सिंह-रोहित शेट्टी ही जोडी पुन्हा येणार एकत्र; पूजा हेगडे जैकलीन फर्नांडिससह दाखवणार 'सर्कस'
या चित्रपटाला क्रिटिक्सकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र बॉक्स ऑफिसवर हा म्हणावी तितकी कमाई करु शकला नाही. इतक्या वर्षानंतर या चित्रपटाला घेऊन सांगितलेला हा किस्सा ऐकून लोकही हैराण झाले आहेत. हा सीन राजकुमार रावने खूपच चांगला केला होता असे मोटवाने यांनी सांगितले.