बॉलिवूडचा सिम्बा फेम रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि रोहित शेट्टी (Rohit Shetty) ही जोडी सूर्यवंशी चित्रपटानंतर पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. नुकत्याचा या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. 'सर्कस' (Cirkus) असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात रणवीरसह पूजा हेगडे (Pooja Hegde) आणि जैकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) देखील प्रमुख भूमिकेत दिसतील. या चित्रपटाचे शूटिंग पुढील महिन्यात मुंबईत सुरु होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रणवीर, पूजा आणि जैकलीन हे त्रिकूट प्रथमच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्येही या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
हा एक विनोदी चित्रपट असणार आहे. याची निर्मिती टी-सीरिज चे भूषण कुमार आणि रोहित शेट्टी करणार आहेत. रिलायन्स एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली हा चित्रपट बनविण्यात येणार आहे.
हेदेखील वाचा- Happy Birthday Ranveer Singh: रणवीर सिंह च्या अफलातून Energetic डान्स स्टाईलची झलक दाखविणारी बॉलिवूडची '5' सुपरहिट गाणी!
BIGGG NEWS... #RanveerSingh and director #RohitShetty team up once again... Film titled #Cirkus... #Rohit's take on #TheComedyOfErrors... Costars #PoojaHegde, #JacquelineFernandez and #VarunSharma... Produced-directed by #RohitShetty... Bhushan Kumar and Reliance Ent present. pic.twitter.com/EodlosSard
— taran adarsh (@taran_adarsh) October 19, 2020
हा चित्रपट विलियम शेक्सपीयर चे गाजलेले नाटक 'द कॉमेडी ऑफ एरर्स' यावर आधारित आहे. या चित्रपटाची घोषणा करत रणवीर सिंह, रोहित शेट्टी आणि भूषण कुमार यांनी एक स्टायलिश अंदाजात फोटोशूट केले आहे. चित्रपट तरन आदर्शन यांनी हा फोटो शेअर करुन ही माहिती दिली आहे.
रणवीर आणि रोहित शेट्टी ची 'सूर्यवंशी' हा चित्रपट यंदा मार्चमध्ये रिलीज होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र आता सिनेमागृहे सुरु झाल्याने लवकरच या चित्रपटाची रिलीज डेटची घोषणा केली जाईल.