Happy Birthday Ranveer Singh: रणवीर सिंह च्या अफलातून Energetic डान्स स्टाईलची झलक दाखविणारी बॉलिवूडची '5' सुपरहिट गाणी!
Ranveer Singh (Photo Credits: File)

Ranveer Singh 35th Birthday: बॉलिवूडमध्ये बाजीराव, अल्लाउद्दीन खिल्जी, सिम्बा यांसारखे एकाहून एक सरस पात्र साकारून अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा प्रेक्षकांसमोर आणणा-या अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याचा आज वाढदिवस! आपल्या अभिनयाने आणि आपल्या पॉवरफुल डान्स स्टाईलने लोकांची मने जिंकणारा रणवीर सिंह याचा जन्म 6 जुलै 1985 मध्ये झाला. रणवीरचे दीपिका पादुकोण वर असलेले अफाट प्रेम जितका चर्चेचा विष ठरला आहे तितकीच रणवीरचा फॅशन स्टाईलही. 2010 मध्ये यशराज फिल्मच्या बॅनरखाली 'बँड बाजा बरात' या चित्रपटातून पदार्पण ते 'पद्मावत' मधील अल्लाउद्दीन खिल्जी असा रणवीरचा प्रवास खरच वाखाणण्याजोगा आहे.

या चित्रपटांसोबत रणवीरच्या पॉवरपॅक डान्समुळे देखील तो अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला. त्याने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट गाणी देखील दिली. त्यातील त्याची डान्स स्टाईल कायम लोकांच्या स्मरणात आहे.

तत्तड तत्तड (रामलीला)

मल्हारी (बाजीराव मस्तानी)

खलीबली (पद्मावत)

हेदेखील वाचा- रणवीर सिंह ने भारतीय सांकेतिक भाषेला 23 वी अधिकृत भाषा बनविण्यासाठी शेअर केला हा खास व्हिडिओ

सिम्बा तेरी फिरकी (सिम्बा)

नशे सी चढ़ गई (बेफिकरे)

आदत से मजबूर ( लेडिज वर्सेस रिकी बेहल)

चित्रपटातील आपल्या पात्राला न्याय देण्यासाठी जीव-तोड मेहनत करणा-या रणीवर सिंह याचा प्रवास खूपच अद्भूत राहिला आहे. असे सांगण्यात येते की, रणवीर सिंह ला बँड बाजा बारात हा चित्रपट मिळण्याआधी त्याने बिग बॅनरचे 3 चित्रपट नाकारले होते. त्याचा त्याच्या करिअर फारसा परिणाम पडला नसून रणवीर अथक परिश्रम करुन स्वत:ला सिद्ध केले आणि बॉलिवूडमधील टॉप 5 अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळविले. अशा या दिलखुलास, मेहनती अभिनेत्याला लेटेस्टली मराठीकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!