
बॉलिवूडचा बाजीराव, सिम्बा रणवीर सिंह आपल्या अभिनयामुळे, लूकमुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र यावेळेस तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. बॉलिवूड अभिनेत रणवीर सिंह (Ranveer Singh) याने भारतीय सांकेतिक भाषेला 23 वी अधिकृत भाषा म्हणून दर्जा मिळावा यासाठी एक विशेष मोहीम सुरु केली आहे. रणवीर यासंबंधीच्या याचिकेवर स्वाक्षरी करत आहे ज्याचा उद्देश या मोहिमेविषयी जागरुकता निर्माण करणे हा आहे. या मोहिमेत अधिकाधिक भारतीयांनी सहभागी व्हावे यासाठी रणवीर एक विशेष व्हिडिओ शेअर केला आहे.
यासाठी रणवीरने रॅपर-कवी स्पिटफायर च्या 'वार्तालाप' (Vartalap) चा एक सांकेतिक भाषेचा व्हिडिओ शेअर केला आहे. या सांकेतिक चिन्हांचा वापर करण्यात आला आहे. 2021 ची दिवाळी होणार 'सुरमयी'; भन्साळींच्या 'Baiju Bawra' साठी Ranveer Singh च्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
रणवीर सिंह ने सांगितले आहे की, लवकरच तो नॅशनल असोसिएशन ऑफ डेफ (NAD) इंडिया द्वारे या अधिकृत याचिकेवर स्वाक्षरी करेल. यात एक्सेस मंत्र फाउंडेशन चे सुद्धा सामिल आहे. त्यांनी सांगितले की "या माध्यमातून आम्ही सांकेतिक भाषेला भारताची 23 वी अधिकृत भाषा बनविण्यासाठी समर्थन देत आहोत."
त्यामुळे अधिकाधिक भारतीयांना या मोहिमेस पाठिंबा द्यावा असे रणवीरने आवाहन केले आहे.
रणवीर सिंह दिग्दर्शक कबीर खान च्या '83' मध्ये लवकरतच दिसेल. हा क्रिकेट वर आधारित चित्रपट आहे. ज्यात भारताने 1983 क्रिकेच विश्व कपची कहानी सांगितली आहे. यात रणवीर कपिल देव यांची भीमिका साकारणार आहे.