2021 ची दिवाळी होणार 'सुरमयी'; भन्साळींच्या 'Baiju Bawra' साठी Ranveer Singh च्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
Ranveer Singh | (Instagram)

बॉलीवूडमध्ये काही दिग्दर्शक आणि अभिनेत्यांच्या जोड्या या बॉक्स ऑफिसवर यशाची 100% हमी देणाऱ्या असतात. गोविंदा-डेविड धवन, शाहरुख खान-यश चोप्रा. इ. तशीच एक जोडी गेल्या काही वर्षात उदयाला आली आहे. ती म्हणजे रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची. 'रामलीला', 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत' नंतर आता ही जोडी अजून एका सिनेमाच्या निमित्ताने एकत्र यायची शक्यता आहे. 'बैजू बावरा' या आगामी सांगीतिक सिनेमासाठी भन्साळींनी रणवीरच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे.

एकीकडे गंगुबाई काठियावाडी (Gangubai Kathiyawadi) या सिनेमाचं चित्रीकरण चालू असताना भन्साळी यांनी 'बैजू बावरा' सिनेमाची घोषणा करताना हा चित्रपट 2021 च्या दिवाळी मध्ये येत असल्याची माहिती काल दिली होती. एकीकडे या सिनेमात रणवीर बैजू बावराची भूमिका करत असल्याचं बोललं जात असताना दुसरीकडे तानसेनची भूमिका अजय देवगण करत असल्याचीही चर्चा होती. पण अजय देवगणने (Ajay Devgn)  ह्या भूमिकेसाठी नकार दिला आहे.

 

(हेही वाचा. Inshallah बंद पडण्यामागे Katrina चा हात; Salman ने केली होती शिफारस)

सोळाव्या शतकामधल्या या गायकाबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. शास्त्रीय संगीतावर असणाऱ्या वेड्या सारख्या प्रेमामुळे त्याला 'बावरा' हे नाव पडल्याची एक कथा आहे, तर दुसरी कथा जी 1952 साली आलेल्या सिनेमामध्ये मांडण्यात आली होती आणि जी या चित्रपटाचीसुद्धा कथा असणार आहे, ती अशी की, 'तानसेन या महान गायकाचं प्रस्थ खूप मोठं होतं. जोवर कोणी तानसेनपेक्षा चांगलं गाऊन दाखवत नाही, तोवर त्यांना शहरामध्ये गाण्याची परवानगी नव्हती. आणि जर त्यात ते असफल ठरले तर त्यांना प्राण गमवावा लागे. या अटीमुळेच आपल्या वडलांना गमवाव्या लागलेल्या प्राणांचा बदला बैजू बावरा तानसेनला हरवून कसा घेतो ही सिनेमाची उर्वरित कथा.' तेव्हा आता हे सांगितीक सूडनाट्य भन्साळी कसे रंगवतात हे पाहणं रंजक ठरेल.