Inshallah बंद पडण्यामागे Katrina चा हात; Salman ने केली होती शिफारस
Salman wanted Katrina in Inshallah (Photo Credits: Instagram)

संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) आणि सलमान खान (Salman Khan) 'इन्शाल्लाह' (Inshallah) चित्रपटासाठी 20 वर्षांनी पुन्हा एकत्र येणार असल्याची बातमी आली आणि प्रेक्षकांची उत्सुकता वाढली. एवढेच नव्हे तर या चित्रपटात आलिया भट्ट (Alia Bhatt) सुद्धा काम करत असल्याचं जाहीर झालं आणि हे त्रिकुट पडद्यावर काय कमाल करतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. पण काही दिवसांपूर्वी चित्रपट चित्रीकरणाच्या उंबरठ्यावर येऊन पोचला आणि चित्रपट बंद पडल्याची बातमी आली. त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला. आता यामागचं खरं कारण कॅटरिना कैफची (Katrina Kaif) केली गेलेली शिफारस असल्याचं बोललं जात आहे.

चित्रपट समीक्षक राजीव मसंद याने 'ओपन मॅगजीन' मध्ये लिहिलेल्या एका स्तंभात याबाबत खुलासा केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार सलमान खान त्याची 'भारत' (Bharat) ची सहअभिनेत्री कॅटरिना कैफला चित्रपट आणण्याबाबत उत्सुक होता. कथासूत्रात काही बदल करून कॅटरिना साठी एक नवा ट्रॅक तयार करायची सलमानची इच्छा होती. पण संजय लीला भन्साळी आपल्या निर्मिती बद्दल काटेकोर असल्या कारणाने त्यांनी कथेमध्ये फेरबदल करण्यास नकार दिला. तसेच बहीण अर्पिताला वेशभूषेची जबाबदारी देण्यात यावी आणि डेजी शाहला चित्रपटात घेतलं जावं या मागण्याही भन्साळींनी फेटाळल्या होत्या. म्हणूनच अखेर भन्साळींनी हा चित्रपटच बंद करण्याचा निर्णय घेतला. (हेही वाचा. Alia Bhatt आहे Ranveer Singh वर नाराज; जाणून घ्या दोघांमधील मतभेदांचं काय आहे कारण)

सलमान आणि भन्साळी यांनी या आधी 'खामोशी' आणि 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटांमध्ये सोबत काम केलं होतं. तर आलिया दोघांसोबतही पहिल्यांदा काम करत होती. या चित्रपटासाठी आलियाने आमिर खान सोबतच्या एका चित्रपटाला नकार दिला होता.