Alia Bhatt आहे Ranveer Singh वर नाराज; जाणून घ्या दोघांमधील मतभेदांचं काय आहे कारण
Gully Boy (Photo Credits: File Image)

'गली बॉय' चित्रपटातून रणवीर सिंग आणि आलिया भट्ट ही जोडी भलतीच प्रसिद्ध झाली. दोघांमधील केमिस्ट्रीला लोकांनी प्रचंड पसंती दर्शवली परंतु यापुढे मात्र प्रेक्षकांना ही जोडी पुन्हा कोणता सिनेमातून दिसेल की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण रणवीरने चक्क आलियासोबत चित्रपट करायला नकार दिला आहे.

रणवीर ने दिलेल्या नाकारामुळे आलिया प्रचंड नाराज असल्याचंही बोललं जातंय.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार आलिया लवकरच तिच्या आगामी सिनेमा 'गंगुबाई' च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. आणि आलियासोबत काम करण्यासाठी रणवीरला विचारण्यात आलं होतं. परंतु त्याने ही ऑफर स्वीकारणासाठी स्पष्ट नकार दिला आहे. तसेच त्याने हा चित्रपट न करण्यामागचं कारणही स्पष्ट न केल्याने आलिया त्याच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे.

रणवीरच नव्हे तर रणबीर कपूरनंही दिला नकार

'गंगुबाई' या चित्रपटातील मुख्य भूमिका करण्यासाठी रणवीरच नाही तर रणबीर कपूरलाही विचारण्यात आलं होतं. पण त्यानेही ही भूमिका करण्यासाठी नकार दिल्याची सध्या इंडस्ट्रीमध्ये चर्चा आहे.

Toofan च्या शूटिंग वेळी Farhan Akhtar च्या हाताला झाले फ्रॅक्चर; Instagram वर फोटो केला शेयर

गंगुबाई या आगामी सिनेमातून कामाठीपुरातील एका महिलेची कथा दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाची कथा हुसैन जैदी लिखीत 'माफिया क्वींस ऑफ मुंबई' या पुस्तकातील एका भागावर आधारित असणार आहे.