Poonam Pandey Last Post (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Poonam Pandey Last Post: आपल्या बोल्ड स्टाइलमुळे प्रसिद्धी मिळवणारी मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) चं आज कर्करोगामुळे (Cancer) निधन झालं. शुक्रवारी सकाळी पूनमच्या आकस्मिक निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली. पूनम पांडेचा मृत्यू झाला यावर चाहत्यांनाही विश्वास बसत नाहीये. सध्या पूनमची शेवटची शेवटची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिपोर्ट्सनुसार, 32 वर्षीय पूनम पांडेचा मृत्यू गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने झाला आहे. पूनमच्या मृत्यूची पुष्टी 2 फेब्रुवारी 2024 रोजी अभिनेत्रीच्या इंस्टाग्राम पोस्टवर प्रसिद्ध झालेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. पूनमची मॅनेजर पारुल चावला यांनी या दु:खद बातमीला दुजोरा दिला आहे.

पूनम पांडेची शेवटची पोस्ट व्हायरल -

पूनम पांडेच्या निधनानंतर तिची शेवटची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मृत्यूच्या तीन दिवस आधी तिने गोव्यात एका क्रूझ पार्टीला हजेरी लावली होती. अभिनेत्रीने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. क्लिपमध्ये पूनम सुरक्षा रक्षकांसोबत दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना पूनमने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'व्हाइट अँड ब्लॅक: द यिन आणि यांग जे माझ्या आयुष्याचा समतोल राखतात.' (हेही वाचा -Poonam Pandey Dies Due to Cervical Cancer: सायलंट किलर समजला जाणार्‍या या गर्भाशयाच्या कर्करोगाबद्दल जाणून घ्या या काही गोष्टी!)

व्हिडिओमध्ये पूनम पांडे काळ्या लेदर पँट आणि पांढऱ्या क्रॉप टॉपमध्ये खूपच सुंदर दिसत होती. सिल्व्हर मल्टीलेअर ज्वेलरी आणि खुल्या केसांनी अभिनेत्रीने तिचा लूक खूपचं आकर्षक दिसत होता. (हेही वाचा, Cervical Cancer होण्याच्या प्रमाणात घट मात्र, तपासणी आणि लसीकरण आवश्यक- डॉक्टरांचा सल्ला).

पहा व्हिडिओ - 

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

अभिनेत्रीच्या निधनाने चाहत्यांना धक्का -

पूनम पांडेच्या आकस्मिक निधनाने लोकांना धक्का बसला आहे. ती आता या जगात नाही यावर काही लोकांचा विश्वास बसत नाही. एका यूजरने लिहिले की, 'बातमी पाहून मला धक्का बसला. मला खोटे वाटत आहे.' दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे की, 'विश्वासचं बसत नाहीये.'