Cancer | File Image

मॉडेल, अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) हीने वयाच्या 32 व्या वर्षी आज जगाचा निरोप घेतला आहे. पूनम पांडे च्या इंस्टाग्राम पोस्ट वर तिच्या निधनाचं वृत्त पोस्ट करण्यात आलं आहे. सुरूवातीला नेटकर्‍यांना हा प्रॅन्क किंवा अकाऊंट हॅक करून केलेला खोडसाळपणा वाटला पण काही वेळापूर्वीच पूनमच्या मीडीया टीम कडून तिच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. चालता बोलता अचानक काही दिवसात पूनमच्या निधनाची बातमी येणं अनेकांना हैराण करणार आहे. पण पूनमचा मृत्यू जा सर्व्हायकल कॅन्सरने (Cervical Cancer) झाला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचं निदान झालं आणि डॉक्टरांनीही तो अ‍ॅडव्हान्स स्टेजमध्ये असल्याचं सांगितलं होतं.  दरम्यान कालच केंद्रीय अर्थसंकल्पामध्येही 9-14 वयोगटातील मुलींसाठी सर्व्हायकल कॅन्सरला रोखणारी लस देण्याबाबत जागृती करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. सध्या सर्वत्र चर्चा असलेला हा सर्व्हायकल कॅन्सर नेमका काय आहे? त्याची लक्षणं, कारण काय आहेत हे जाणून घेत या 'सायलंट किलर' समजल्या जाणार्‍या आजाराबद्दल या निमित्ताने थोडी माहिती घ्या.

सर्व्हायकल कॅन्सर काय असतो?

National Cancer Institute, च्या माहितीनुसार  सर्व्हायकल कॅन्सर हा महिलांमध्ये cervix म्हणजे गर्भाशयाच्या तोंडाजवळीक ग्रंथीमध्ये वाढतो. cervix गर्भाशयाला vagina सोबत जोडतो. हा कॅन्सर वाढण्याआधी cervical tissue मध्ये पेशींची अनियंत्रित वाढ होते. जर त्या काढून टाकल्या नाहीत तर त्यामधून कॅन्सर निर्माण होऊ शकतो.

सर्व्हायकल कॅन्सर  लक्षणं काय?

सर्व्हायकल कॅन्सर मध्ये सेक्स नंतर vaginal bleeding, मेनोपॉज नंतर vaginal bleeding, दोन मासिक पाळी दरम्यानही रक्तस्त्राव होणंं, मासिकपाळीतही रक्तस्त्राव होणं, पेल्विक भागात वेदना, पाठ, कंबरेचा खालील भागात वेदना असा त्रास जाणवतो. अशक्तपणा, थकवा जाणवतो.

सर्व्हायकल कॅन्सर  कशामुळे होऊ शकतो?

कमजोर रोगप्रतिकार शक्ती, स्मोकिंगची सवय, लहान वयात सेक्स, ओरल सेक्स, लठ्ठपणा यामुळे सर्व्हायकल कॅन्सर होऊ शकतो.  HPV infection मुळेही सर्व्हायकल कॅन्सर होऊ शकतो.  सेक्स्श्युअली अ‍ॅक्टिह असणार्‍यांमध्ये HPV infections एका टप्प्यावर होतंच आणि ते रोगप्रतिकार शक्तीच्य जोरावर आपोआप ठी देखील होऊ शकतं पण तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर मात्र धोका वाढतो.  (हेही वाचा, Cervical Cancer होण्याच्या प्रमाणात घट मात्र, तपासणी आणि लसीकरण आवश्यक- डॉक्टरांचा सल्ला).

सर्व्हायकल कॅन्सर अत्यंत टाळता येण्याजोगा आणि लवकर निदान झाल्यास पूर्ण बरा होऊ शकतो. HPV लसीकरण, नेहमीच्या सर्व्हायकल कॅन्सरच्या  तपासण्याआणि आवश्यकतेनुसार योग्य पाठपुरावा उपचार केल्यास या कॅन्सरवरही मात केली जाऊ शकते.

टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला आहे. हा वैद्यकीय सल्ला नव्हे. आरोग्याबाबत समस्यांचे निराकरण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे.