Dia Mirza Honeymoon Pic: अभिनेत्री दीया मिर्झा हिच्या हनिमूनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Dia Mirza and Vaibhav Rekhi (Photo Credits: Instagram)

बॉलिवडूची अभिनेत्री दीया मिर्झा (Dia Mirza) लवकरच आई होणार आहे. तिने याच वर्षी 15 फेब्रुवारीला व्यापारी आणि गुंतवणूकदार वैभव रेखी (Vaibhav Rekhi) याच्यासोबत लग्न केले होते. दीया आणि वैभवने दुसऱ्यांदा लग्न केले आहे. लग्नाच्या कित्येक दिवसांनंतर दोघेही हनिमूनवर (Honeymoon) मालदीवमध्ये गेले. त्यावेळी दीया मिर्झाची सावत्र मुलगी समायरा (Step Daughter Samaira) देखील त्यांच्यासोबत होती. सध्या दिया मिर्झा गर्भवती असून अलीकडेच तिने हनिमूनला गेलेल असतानाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे आता खूप व्हायरल होत आहेत.

दीया मिर्झा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. तिने आपल्या लग्नाची आणि हनिमूनची अनेक फोटो शेअर केली आहेत. नुकतीच तिने तिच्या हनिमूनची कधी न पाहिलेले फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. दीया मिर्झाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तीन चित्रे आणि दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दीयाचा पती वैभव रेखी आणि तिची सावत्र-मुलगी समायरा या एका नौकावर बसून कॅमेऱ्याकडे पाहत आहेत. तसेच दुसऱ्या फोटोत दीया मिर्झा तिच्या बेबी-बंपला हातांनी लपवताना दिसत आहे. तिने या पोस्टवर 'एकत्र घालवलेला सर्वात संस्मरणीय आणि जादूचा काळ', असे कॅप्शन दिले आहे. हे देखील वाचा- Bhuj The Pride of India Teaser: अजय देवगणच्या 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया'चा दमदार टीझर प्रदर्शित; प्रेक्षकांना मिळणार अ‍ॅक्शन-वॉर सीन्सची मेजवानी (Watch Video)

दीया मिर्झाचे हनिमूनचे फोटो-

 

View this post on Instagram

 

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial)

दीयाचे पहिले लग्न 2014 मध्ये प्रियकर साहिल संघासोबत झाले होते. त्यानंतर 2019 मध्ये दिया मिर्झाने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून घटस्फोटाची माहिती दिली होती.