Bhuj The Pride of India Teaser: अजय देवगणच्या 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया'चा दमदार टीझर प्रदर्शित; प्रेक्षकांना मिळणार अ‍ॅक्शन-वॉर सीन्सची मेजवानी (Watch Video)
Ajay Devgn and Sanjay Dutt in Bhuj: The Pride of India (Photo Credits: Twitter)

अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgn) बहुप्रतीक्षित अशा 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' (Bhuj The Pride of India) या मल्टीस्टारर फिल्मचा दमदार टीझर रिलीज झाला आहे. हा टीजर म्हणजे अ‍ॅक्शनचा पुरेपूर धमाका आहे. या देशभक्तीपर चित्रपटात प्रेक्षकांना अ‍ॅक्शन-वॉर सीन्सचा डबल डोस मिळणार आहे. चित्रपटामध्ये अनेक व्हीएफक्स पाहायला मिळणार असून, त्याची झलक टीजरमध्ये पाहायला मिळाली आहे. आता चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर लोकांना त्याच्या ट्रेलरची उत्सुकता आहे, जो उद्या म्हणजेच 12 जुलै रोजी येणार आहे. टीझरमध्ये अजय देवगणचा दमदार आवाज कानी पडत आहे.

टीझरची सुरुवात होते ते भारताच्या तिरंगी झेंड्याने आणि त्यानंतर हळू हळू युद्धाचे सिन्स नजरेस पडतात. ज्या प्रकारे हे सर्व चित्रीकरण केले आहे ते पाहून अंगावर काटा उभा राहतो. टीझरमध्ये नोरा फतेही, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा आणि अजय देवगन यांची झलक दिसत आहे. या चित्रपटाचा प्रीमियर 13 ऑगस्टला थेट ओटीटी प्लॅटफॉर्म 'डिस्ने प्लस हॉटस्टार' वर होणार आहे.

'भुज' चित्रपटाची कथा ही, 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी घडलेल्या एका खऱ्या आणि धाडसी घटनेवर बेतलेली आहे. या चित्रपटामध्ये अजय भारतीय हवाई दलाचे स्क्वॉड्रॉन लीडर विजय कर्णिकची भूमिका साकारत आहे. कर्णिक त्यावेळी भुज विमानतळाचे इंचार्ज होते. चित्रपटाची कहाणी एअरफोर्सच्या एका धाडसी अधिकाऱ्याची ज्याने पाकिस्तानच्या हल्ल्यापासून केवळ आपल्या एअरबेसचे संरक्षणच केले नाही, तर गरज पडल्यास त्याने आसपासच्या खेड्यातल्या शेकडो महिलांची टीम तयार केली आणि संपूर्ण एअरबेसचा नकाशा एका रात्रीत बदलला. (हेही वाचा: Bigg Boss 15: टीव्हीच्या आधी 6 आठवडे OTT वर प्रदर्शित होणार बिग बॉस 15; समोर आला नवा ट्विस्ट)

या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक दुधैय्या यांनी केले आहे. रणछोडदास पागीच्या भूमिकेत संजय दत्त आहे. विक्रम सिंग बाज जेठजच्या भूमिकेत आहे. सुंदरबेन जेठा असे सोनाक्षीच्या पात्राचे नाव आहे. त्याचवेळी नोरा हिरा रहमान नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे.