![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/03/Know-Your-Status-2019-03-09T120101.989-380x214.jpg)
प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) यांच्या लग्नाला तीन महिने उलटले आहेत. मात्र त्यानंतर असा खुसाला समोर आला आहे की, प्रियांका चोप्रा हिला निकच्या घरातील सदस्यामधील एका व्यक्तीला या दोघांची जोडी अजिबात आवडायची नाही. परंतु जोनस परिवाराने प्रियांका आधीच पसंद केले होते. तरीही या सदस्याला प्रियांका हिचा स्विकार करण्यास वेळ लागत होता.
जोनस यांच्या परिवारातील प्रियांका हिटा स्विकार करण्यास वेळ घेणारा सदस्य म्हणजे निक ह्याच्या मोठा भाऊ केविनची छोटी मुलगी वेलेंटिना हिला प्रियांका आणि निकची जोडी आवडायची नाही. तसेच वेलेंटिना आणि निक यांचे खुप जवळचे नाते होते. त्यामुळे जेव्हा प्रियांका निकच्या खाद्यांवर वगैरे हात ठेवायची तेव्हा वेलेंटिना हिला ते सर्व आवडाचे नाही. मात्र आता हळूहळू घरातील मंडळींचा प्रियांका भाग झाल्याने वेलेंटिना हिने प्रियांकाला समजून घेत आहे.(हेही वाचा-प्रियांका चोप्रा हिने पोस्ट केला Bathtub मधील हॉट फोटो, निकला उत्तम पती म्हणाली)
तर जोनस ब्रदर्स यांनी नुकतेच एक म्युझिक 'सकर' (Sucker) लॉन्च केले आहे. त्यामध्ये निकचे अन्य भाऊ आणि बायको प्रियांका चोप्रा ही झळकली आहे.