सध्या बॉलिवूडच्या अनेक कलाकारांभोवती कोरोना वायरसचा विळखा बसला आहे. त्यापैकी एक मिलिंद सोमण ! बॉलिवूड अभिनेता, मॉडेल आणि 'आयर्नमॅन' अशी ओळख असणारा मिलिंद सोमण (Milind Soman) याने नुकतीच कोविड 19 वर मात केली आहे. काल त्याने आरटी पीसीआर टेस्ट निगेटीव्ह आल्याचं म्हटलं आहे. पत्नी अंकिता सोबतचा एक फोटो शेअर करत त्याने क्वारंटीन काळाचा शेवट झाला असल्याचं सांगत चाहत्यांचे डॉक्टरांचे आभार मानले आहेत. दरम्यान मागील दीड आठवड्यांपासून तो घरीच क्वारंटीन होता. इंस्टाग्रामवर कोविड 19 वर मात केल्याची माहिती देताना त्याने या काळातील त्याच्या औषधोपचारांची देखील माहिती चाहत्यांना दिली आहे.
कोरोना संसर्गाच्या काळात त्याला आठवडाभरासाठी कोणताच वास येत नव्हता. कोविड 19 च्या या लक्षणा व्यतिरिक्त त्याला इतर त्रास किंवा लक्षणं नसल्याची त्याने सांगितलं आहे. या काळात मिलिंदने एक काढा घेतला. अनेकांनी त्याला या काढ्याविषयी विचारले असल्याने त्याने इंस्टा पोस्ट मध्ये त्याची माहिती दिली आहे. मिलिंदच्या पोस्टनुसार, धणे, मेथीचे दाणे, काळामिरी, तुळशीचं पानं, आलं आणि गूळ याचा काढा तो पित होता. 5 दिवस तो ब्लड थिनर घेत होता कारण त्याच्या D dimer levels वाढल्या होत्या. याव्यतिरिक्त तो इतर औषधं किंवा सप्लिमेंट्स घेत नव्हता. दरम्यान यावेळेस त्यावेळी त्याने प्रत्येकवेळी डॉक्टरांचा सल्ला ऐका असेदेखील सांगितले आहे. मिलिंदा सोमण ने त्याच्या होम क्वारंटीन काळात त्याला मदत केलेल्या डॉ. जीवन जैन यांचे देखील आभार मानले आहेत. (नक्की वाचा: कोविड-19 वरील उपचारासाठी आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी औषधांसंबंधित खास मार्गदर्शक सूचना; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे दिली माहिती).
मिलिंद सोमण पोस्ट
View this post on Instagram
दरम्यान मिलिंद हा फीटनेस फ्रीक आहे. तो पिंकाथॉनचा अॅम्बॅसेडर आहे. महिलांमध्ये स्वतःच्या आरोग्याबाबत, फीटनेस बाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी काम करतो. सोबतच आयर्नमॅन ही जगातील मानाची आणि सर्वात कठीण स्पर्धा देखील त्याने वयाच्या 50 शी मध्ये लिलया पूर्ण करण्याची किमया त्याने साधत सार्यांनाचा धक्का दिला होता. मिलिंद सोमणची आई देखील फीटनेस च्या दृष्टीने विशेष जागृत आहे.
काही दिवसांपूर्वी होळीच्या दिवशी मिलिंदने कोविडशी सामना करताना देखील पत्नी अंकिता सोबत रंग सेलिब्रेट केल्याचं, पुरणपोळी, आंब्यावर ताव मारल्याचं त्याने खास पोस्ट द्वारा सांगितलं आहे.