Vivek Oberoi Tweet (Photo Credits-Twitter)

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) याने सोशल मीडियात एक्झिट पोलवरुन (Exit Poll) ट्वीट केले आहे. यामध्ये विवेकने ऐश्वर्या राय/बच्चन (Aishwarya Rai)-सलमान खान (Salman Khan) सोबत स्वत:च्या फोटोचे कोलाज केलेला एक फोटो पोस्ट केला असल्याने नेटकऱ्यांनी याबद्दल संताप व्यक्त केला आहे. त्याचसोबत महाराष्ट्र महिला आयोगाने (Maharashtra Women Commission) सुद्धा याबाबत गंभीर दखल घेतली असून कारवाई करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र राज्य महिला आयोग विवेकने केलेल्या आक्षेपार्ह ट्वीटवर कारवाई असे सांगण्यात येत आहे. तसेच दिल्ली महिला आयोगाच्या मुख्याधिकारी स्वाति मेलवाल यांनीसुद्धा सोशल मीडियात विवेकने केलेल्या ट्वीटवर आपले मत मांडले आहे.(PM Narendra Modi Biopic: नागपूर येथे नितीन गडकरी आणि विवेक ओबेरॉय यांच्या हस्ते पी.एम. नरेंद्र मोदी चित्रपटाच्या नव्या पोस्टरचे अनावरण)

विवेकने ट्वीट केलेल्या पोस्टच्या खाली असे लिहिले आहे की, येथे काही राजकरण नाही तर फक्त आयुष्याची कथा आहे. मात्र यावरुन आता सोनम कपूरने सुद्धा विवेकला सुनावले आहे.

दरम्यान सलमान खान सोबत ब्रेकअप झाल्यानंतर विवेक ओबेरॉय सोबत ऐश्वर्या ही नात्यात असल्याची चर्चा जोरदार रंगली होती.