PM Narendra Modi Biopic: नागपूर येथे नितीन गडकरी आणि विवेक ओबेरॉय यांच्या हस्ते पी.एम. नरेंद्र मोदी चित्रपटाच्या नव्या पोस्टरचे अनावरण
PM Narendra Modi Biopic New Poster, Vivek Oberoi and Nitin Gadkari (Photo Credits-ANI)

PM Narendra Modi Biopic: देशात लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर पी.एम. नरेंद्र मोदी या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. तर नागपूर  (Nagpur) येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) यांच्या हस्ते या नव्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले आहे.

तत्पूर्वी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येऊ नये अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येत होती. तसेच हा वाद सुप्रीम कोर्टातही जाऊन पोहचला होता. त्याचसोबत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सुद्धा पुढे ढकलण्यात आली होती.मात्र आता देशात सात टप्प्यातील मतदान संपल्यानंतर पी.एम. नरेंद्र मोदी यांच्या बायोपिक चित्रपटाचे नवे पोस्टर झळकवण्यात आले आहे.(PM Narendra Modi या बायोपिकमधून 'ही' अभिनेत्री साकारणार 'जसोदाबेन' यांची भुमिका)

तर चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय प्रवासासोबत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची झलक दाखवण्यात आली आहे. त्याचसोबत आध्यात्मिक माध्यमातून मोदी यांच्या स्वभावाचे वर्णन करण्यात आले आहे. येत्या 24 मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच चित्रपटामधून मोदी यांच्या कार्याचा कितपत प्रभाव प्रेक्षकांवर पडणार आहे हे पाहण्याजोगे असणार आहे.