Raj Kundra (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुद्राच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अश्लील व्हिडीओ प्रकरणात पुन्हा एकदा राज कुद्रावर टांगती तलवार आहे. कारण सायबर ब्रान्च कडून राज कुद्रासह मॉडेल शर्लिन चोप्रा, पुनम पांडे विरुध्द तब्बल ४५० पानांची चार्जशीट दाखल करण्यात आली आहे.  राज कुंद्रा, मॉडल शर्लिन चोपड़ा, पूनम पांडे, निर्माता मीता झुनझुनवाला आणि कॅमरामैन यांनी मुंबई उपनगरातील पंचतारांकीत हॉटेलमध्ये जावून अश्लील व्हिडीओ शूट केल्या प्रकरणी ही चार्जशीचट दाखल करण्यात आली आहे. तसेच या व्हिडीओतून पैसा मिळवण्यासाठी हे अश्लील व्हिडीओ विविध ओटीटी प्लाटफॉर्मवर टाकण्याचा त्यांच्यावर आरोप आहे.  तरी महाराष्ट्र सायबर विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या व्हिडीओत राज कुद्रांचा समावेश नसला तरी या व्हिडीओच्या निर्मितीसह ह्याच्या विक्रित राज कुद्रांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

तीन वर्षांपूर्वी काही वेबसाइट्सवर अश्लील कंटेन्ट अपलोड करत असल्याची तक्रार कस्टम आणि सेंट्रल एक्साईजच्या अधिकाऱ्याने केली होती. त्यानंतर 2019 मध्ये सायबर पोलिसांनी कलम 292 अंतर्गत आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी तब्बल तीन वर्षानंतर पोलिसांनी मॉडेल शर्लिन चोप्रा, पूनम पांडे, कॅमेरामन राजू दुबे, मीता झुनझुनवाला, बनाना प्राइम ओटीटी संचालक सुजित चौधरी, आर्मस्प्राईम मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे राज ​​कुंद्रा आणि त्यांचे कर्मचारी उमेश कामत यांच्या विरोधात 450 पानांची चार्जशीट दाखल केली आहे. पण या चार्जशीटमध्ये केवळ व्हिडीओत दिसत असणाऱ्या शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडेच्या नावाचा समावेश आहे. राज कुद्रांचं नाव या चार्जशीटमध्ये नसलं तरी पुन्हा एकदा कुद्रांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. (हे ही वाचा:- Amir Khan: अभिनेता अमिर खानचा मराठमोळा जावई पाहिलात का? लेकीच्या साखपुड्यात साखरपुड्यात पापा कहते है; पहा व्हिडीओ)

 

तरी या प्रकरणात बनाना प्राइम-ओटीटी (Banana Prime OTT) प्लॅटफॉर्मचे संचालक सुवाजित चौधरी (Suvajit Chaudhary), पूनम पांडे (Poonam Pandey), कॅमेरामन राजू दुबे (Raju Dubey), मीता झुनझुनवाला (Meet Jhunjhunwala), शर्लिन चोप्राच्या (Sherlyn Chopra) नावाचा समावेश आहे. तरी चार्जशीट फाईल (Charge sheet) केल्यानंतर राज कुद्रा (Raj Kundra) यावर काय प्रतिसाद देणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.