Amir Khan: अभिनेता अमिर खानचा मराठमोळा जावई पाहिलात का? लेकीच्या साखपुड्यात साखरपुड्यात पापा कहते है; पहा व्हिडीओ

अभिनेता अमिर खानची (Amir Khan) मुलगी आयरा खान (Ayara Khan) हिने आपला जोडीदार निवडला आहे. नुकताचं या दोघांचा साखरपुडा (Engagement) पार पडला असुन बॉलिवूडमधील (Bollywood) विविध बड्या सिलेब्रिटीजने (Celebrity) या साखरपुडा (Engagement) सोहळ्यास हजेरी लावली आहे. आयरा खान ही अभिनेता अमिर खान आणि किरण रावची (Kiran Rao) मुलगी आहे. किरण राव ही अमिर खानची दुसरी बायको असुन आता अमिर खान आणि किरण राव यांनी देखीव घटस्फोट (Divorce) घेत विभक्त झाले आहेत. तरी आयरा खानचा होणार नवरा हा कुणी मोठा अभिनेता नसुन सरळ साधा मराठमोळा नुपूर शिखरे आहे. नुपूर शिखरे (Nupur Shikhare) हा आयराचा जीम ट्रेनर (Gym Trainer) होता दरम्यान त्यांची लव्ह स्टोरी (Love Story) जीममध्येच सुरु झाली. गेले दोन वर्षा पासून आयरा आणि नुपूर एकमेकांना डेट  करत होते. यामुळे दोघांनाही मोठ्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. पण आता दोघांनी ही साखरपूडा केला असुन लवकरच ते विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती मिळत आहे.

 

आयरा आणि नुपूरच्या साखरपूड्यास विविध बॉलिवूड सिलेब्रिटीजने (Bollywood Celebrity) हजेरी लावली होती. अभिनेता आणि वडील अमिर खान (Amir Khan), आई किरण राव (Kiran Rao), अभिनेता इम्रान खान (Emran Khan) तसेच संपूर्ण खान परिवाराने या सोहळ्यास विशेष उपस्थिती दर्शवली होती. अभिनेत्री फातीमा सना (Fatima Sana) देखील या साखरपूडा (Engagement) सोहळ्यास उपस्थित होती. तरी अभिनेता अमिर खान (Actor Amir Khan) आणि फातीमा सनाच्या (Fatima Sana) अफेअर (Affair) नंतर फातीमाची अमिरच्या कौटुंबिक कार्यक्रमात उपस्थिती ही सगळ्याचं लक्ष वेधुन घेणारी होती. (हे ही वाचा:- Drishyam 2 Box Office Collection Day 1: अजय देवगणच्या 'दृश्यम 2' चित्रपटाने रचला नवा विक्रम; पहिल्याचं दिवशी केली 'एवढ्या' कोटींची कमाई)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

आयरा खानचा (Ayara Khan) हा साखरपूडा सोहळा मुंबईत (Mumbai) पार पडला असुन सध्या या कार्यक्रमाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल (Social Media Viral) होत आहे. तरी अमिरच्या  मुलीची मराठमोळ्या पसंतीची चर्चा बॉलिवूडमध्ये (Bollywood) होत आहे. आयराचा होणार नवरा नुपूर हा सुप्रसिध्द जिम ट्रेनर असुन मुंबईत विविध सिनेअभिनेत्यांना तो जीम ट्रेनिंग देतो.