Drishyam 2 Box Office Collection Day 1: अजय देवगणच्या 'दृश्यम 2' चित्रपटाने रचला नवा विक्रम; पहिल्याचं दिवशी केली 'एवढ्या' कोटींची कमाई
Drishyam 2 (PC- Facebook)

Drishyam 2 Box Office Collection Day 1: बॉलीवूडचा 'सिंघम' अभिनेता अजय देवगणचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'दृश्यम 2' (Drishyam 2) गेल्या शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला चाहत्यांचा भरभरून पाठिंबा मिळत आहे. 'दृश्यम 2' हा अजय आणि तब्बूच्या 'दृश्यम' चित्रपटाचा सिक्वेल आहे. पुन्हा एकदा या जोडीने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे, 'दृश्यम 2' ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई केली आहे. हा चित्रपट आता वर्षातील दुसरा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे.

अजय देवगण आणि तब्बूचा नुकताच प्रदर्शित झालेला 'दृश्यम 2' या चित्रपटाने शुक्रवारी पहिल्याच दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 15.38 कोटी रुपयांची कमाई केली. 'दृश्यम 2' ने अक्षय कुमारच्या राम सेतूला त्याच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनसह मागे टाकले आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित, दृश्यम 2 मध्ये इशिता दत्ता, अक्षय खन्ना, रजत कपूर आणि श्रिया सरन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अजय देवगण विजय साळगावकर या साध्या पण हुशार माणसाची भूमिका साकारत आहे. (हेही वाचा - CAT Trailer Out: रणदीप हुड्डा 'कॅट' बनून पंजाबमधील अंमली पदार्थांच्या तस्करीचा करणार पर्दाफाश, ट्रेलर बघितला का?)

विजय साळगावकर आपल्या कुटुंबाला कायदा आणि तुरुंगातून वाचवण्यासाठी एक गूढ उकलतात. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि म्हटले की, 'दृश्यम 2 ने इंडस्ट्रीला पुनरुज्जीवित केले आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15.38 कोटींची कमाई केली होती. वीकेंडपर्यंत हा आकडा 50 कोटींच्या पुढे जाऊ शकतो.