लव्ह स्टोरी: आधी टक्कल मग प्रपोज; अनुपम खेर यांच्याबद्दल किरण खेर यांनी सांगितलेले काही किस्से
Anupam Kher-Kirron Kher Love Story | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Anupam Kher-Kiran Kher Love Story: अनुपम खेर (Anupam Kher) आणि किरण खेर (Kiran Kher) हे दाम्पत्य केवळ बॉलिवूडच नव्हे तर त्यांच्या चाहत्यांमध्येही चांगलेच प्रसिद्ध आहे. अनुपम खेर हे प्रसिद्ध अभिनेते आहेत. तर त्यांच्या पत्नी भाजप खासदार. कोलकाता (Kolkata) येथे एक नाटक करत असताना त्यांना एकमेकांवरील प्रेमाचा साक्षात्कार झाला. या क्षणांबद्दल सांगताना किरण खेर सांगतात 'अनुपम तेव्हा काही वेगळाच वाटत होता. त्याने कोणत्यातरी एका चित्रपटासाठी टक्कल केला होता. माझ्या खोलीतून जाताना त्याने माझ्याकडे पाहिले. आमची नजरानजर झाली. नजरानजर होण्याचा हा क्षण आम्हाला एक वेगळीच अनुभूती देऊन गेला. आमच्यात काहीतरी निर्माण झाल्याचे आम्हाला जाणवले.'

दोघांना एकमेकांबद्दल असलेल्या प्रेमाची जाणीव तर झाली होती. पण, हे समोरच्याला आगोदर सांगणार होण? सर्व लव्हबर्ड्सना पडतो तो प्रश्न याही कपलला पडला होता. पण, अनुपम खेर यांनी प्रश्न निकालात काढला. प्रपोज करण्यासाठी अनुपम यांनीच पुढाकार घेतला. त्या आठवणीबद्दल किरण खेर सांगतात, 'एके दिवशी अनुपम माझ्या (किरण खेर) घरी आला. तो म्हणाला, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे. मी दरवाजा उघडताच तो म्हणाला मला वाटते की, मी तुझ्यावर प्रेम करु लागलोय. मग काय.. मलाही तसेच वाटत होते. इतक्या वर्षांच्या दोस्तीत प्रेमच तर होते.'

दरम्यान, अनुपम खेर यांनी आपल्या पहिल्या पत्नीपासून तर, किरण खेर यांनी आपल्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला. दोघांनी मिळून 1985 मध्ये विवाह केला. किरण आणि अनुपम यांनी मिळून अपत्याला जन्म दिला नाही. अनुपम यांना पहिल्या पत्नीपासून जन्मलेला एक मुलगा आहे. त्याचे नाव सिकंदर आहे. (हेही वाचा, The Accidental Prime Minister सिनेमाच्या वादावर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया, राहुल गांधींनी विरोध करणार्‍यांना दटावले पाहिजे!)

अनुमप यांच्या आठवणींबद्दल बोलताना किरण खेर सांगतात, कॉलेजला असताना अनुपम खेर हे क्रिकेट खेळायचे. क्रिकेटमध्ये ते सलामीचे फलंदाज होते. त्या वेळी त्यांना मुलींसोबत फ्लर्ट करायलाही आवडायचे. अनेक मुली कॉलेजच्या दिवसात अनुपम यांच्यावर फिदा असत. अनुपम यांचे स्मीतहस्य सर्वांना मोहीत करायचे. या हस्यानेचे माझी विकेट घेतली. मलाही जाळ्यात ओढले. सुरुवातीला आम्ही मित्र बनलो आणि मग एकमेकांच्या प्रेमात पडलो, अशी आठवण किरण खेर अनुपम खेर यांच्याबद्दल सांगतात.