The Accidental Prime Minister सिनेमाच्या वादावर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया, राहुल गांधींनी विरोध करणार्‍यांना दटावले पाहिजे!
Anupam Kher on Maharashtra Youth Congress objecting to The Accidental Prime Minister (Photo Credits: Twitter/ ANI)

The Accidental Prime Minister: बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher)  आणि अक्षय खन्ना (Akshay Khanna) यांचा 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' (The Accidental Prime Minister) या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर वाद-विवादाला सुरूवात झाली आहे. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतलेला असल्याने कॉग्रेसच्या काही नेत्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. या वादविवादावर अनुपम खेर यांनी खुलासा केला आहे.

अनुपम खेर यांनी मीडियाशी बोलताना हा सिनेमा 2014 साली आलेल्या पुस्तकावर आधारित असल्याचं सांगितलं आहे. या पुस्तकाच्या प्रदर्शनाच्या वेळेस कोणत्याच विरोध झाला नव्हता असे म्हटलं आहे. 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' या सिनेमाला जितका विरोध होईल तितका या सिनेमाचा प्रचार होईल असे म्हटलं आहे. The Accidental Prime Minister Trailer: द ऐक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर ट्रेलर रिलिज

अनुपम खेर यांची प्रतिक्रिया -

मीडियाशी बोलताना अनुपम खेर म्हणाले, मी नुकतचं राहुल गांधी यांचं 'अभिव्यक्ती स्वातंत्र्या'वरील एक ट्विट पाहिलं. त्यामुळे माझ्यामते कॉंग्रेसचे जे कार्यकर्ते विरोध करत आहेत त्यांना राहुल गांधींनी दटावले पाहिजे.

सचिन सावंत यांची टीका

'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' हा सिनेमा मनमोहन सिंग आणि काँग्रेसची बदनामी करणारा असल्याचं मत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केलं आहे. ज्या मनमोहन सिंग यांना एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर म्हटलं जातंय, त्यांनीच अतिशय अवघड स्थितीतून भारताला बाहेर काढलं. मात्र आताच्या पंतप्रधानांनी देशाचाच एक्सिडंट केला,' अशा शब्दांमध्ये सावंत यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. स्वत:ला मोठं होता येत नसेल, तर दुसऱ्याला लहान दाखवलं जातं, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हा चित्रपट, टीका त्यांनी केली आहे.

कालच 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. आज कॉंग्रेस दिनाच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा डॉ. मनमोहन सिंग पोहचले तेव्हा मीडियांनी या वादविवादांबाबत प्रश्न विचारला. मात्र डॉ. सिंग यांनी हसून हा विषय टाळत कोणतीच प्रतिक्रिया न देता पुढे निघुन गेले.