The Accidental Prime Minister Trailer: द ऐक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर ट्रेलर रिलिज
(Photo Credits: Youtube)

प्रदीर्घ काळापासून चर्चेत असलेल्या द ऐक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर (The Accidental Prime Minister) चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे माध्यम सल्लागार संजय बारू यांच्या 'The Accidental Prime Minister' पुस्तकावर हा चित्रपट आधारलेला आहे.

या चित्रपटात माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर दिसरणार आहेत. 'The Accidental Prime Minister' या पुस्ताकत 2014 ते 2014 या काळातील राजकारणातील अनेक घटना आणि तत्कालीन प्रसंगांबाबात लिहिले आहे. (हेही वाचा, अनोख्या लेस्बियन लव्हस्टोरीमध्ये अनिल आणि सोनम कपूर पहिल्यांदाच एकत्र)

या चित्रपटात पुस्तकाचे लेखक संजय बारू यांच्या भूमिकेत अक्षय खन्ना दिसणार आहे. तर, सुजैन बर्नट हिने सोनिया गांधी यांची भूमिका साकारली आहे. आहना कुमार प्रियंका गांधी यांची, दव्या सेठी गुरशरण कौर आणि अर्जुन माथुर राहिल गांधी यांची भूमिका साकारताना दिसत आहे. विजय रत्नाकर गुट्टे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट 11 जानेवारी 2019मध्ये प्रदर्शित होणार आहे.