Jayeshbhai Jordaar First Look: रणवीर सिंह साकारणार गुजराती तरुणाची भूमिका; पाहा त्याचा हा हटके लुक
Ranveer Singh (Photo Credits: Instagram)

Jayeshbhai Jordaar First Look of Ranveer Singh: बॉलीवूड अभिनेत्यांमध्ये सर्वात आघाडीवर असणारं नाव म्हणजे रणवीर सिंह. रणवीर नेहमीच आपल्या हटके फॅशन सेन्स आणि उत्तम अभिनय कौशल्यामुळे चर्चेत असतो. तो नेहमी मोजक्याच भूमिका निवडतो परंतु त्याने साकारलेला प्रत्येक रोल हा एका वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचवतो. आताही अशाच एका वेगळ्या आणि हटके भूमिकेसोबत तो प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येणार आहे. ‘जयेशभाई जोरदार’ या आगामी सिनेमात तो प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

‘जयेशभाई जोरदार’ या सिनेमातील रणवीरचा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यात तो एका गुजराती तरुणाच्या अवतारात दिसत आहे. त्याचा हा हटके लुक सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होताना दिसत आहे.

रणवीरने या नव्या लुक मध्ये पोलका डॉट्स असणारं ऑरेंज कलरचं टिशर्ट घातलं आहे. त्याला सूट होईल अशी फेडेड पॅन्ट देखील त्याला परफेक्ट मॅच होताना दिसते.

पाहा रणवीर सिंहचा 'जयेशभाई जोरदार’ मधील फर्स्ट लुक

 

View this post on Instagram

 

JAYESHBHAI hain ekdum JORDAAR! 🤓💗💪🏾 #JayeshbhaiJordaar #ManeeshSharma #DivyangThakkar @yrf

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

पती रणवीर सिंह सोबत काम करण्यास दीपिका पादुकोण ने दिला नकार; रिअल लाईफ नातं ठरलं रिल लाईफच्या ब्रेकअपचे कारण

दरम्यान, रणवीर त्याच्या नव्या भूमिकेविषयी पिंकविला या वेबसाईटला सांगताना म्हणाला, "चार्ली चॅपलिननं एकदा म्हटलं होतं की जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला हसवायचं असेल तर दुःख पचवण्याची क्षमता तुमच्यात असायलाचं हवी आणि त्याच्याशी तुम्हाला खेळता आलं पाहिजे. जयेशभाई असाच एक व्यक्ती आहे जो अडचणीच्या परिस्थितीत काहीतरी विलक्षण कामगिरी करून जातो. त्याचसोबत तो संवेदनशील आणि दयाळू आहे. तो पुरुषप्रधान संस्कृतीमध्येही पुरुष आणि महिलांना समान अधिकार मिळावेत यावर विश्वास ठेवणारा आहे."