पती रणवीर सिंह सोबत काम करण्यास दीपिका पादुकोण ने दिला नकार; रिअल लाईफ नातं ठरलं रिल लाईफच्या ब्रेकअपचे कारण
Deepika padukone And Ranveer Singh (Photo Credit:Instagram)

बॉलिवूडमधील सर्वात हॉट आणि क्युट जोडी रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने याबाबत खुलासा केला आहे. दीपिकाने या मुलाखतीत आपण या पुढे रणवीर सिंह सोबत चित्रपटात काम करणार नाही, असे सांगत गौप्यस्फोट केला. तिचा हा निर्णय ऐकून अनेक चाहत्यांच्या पायाखालची जमिनीच सरकली. कारण दीपिका आणि रणवीर लग्न करण्याआधी पासूनच प्रेक्षकांच्या गळ्यातील बनले होते. रामलीला, बाजीराव मस्तानी यांसारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांना अक्षरश: या जोडीला डोक्यावर उचलून धरले. त्यामुळे दोघांना एकत्र बघणेच प्रेक्षक जास्त पसंत करु लागले आणि हिच जोडी पुढे जाऊन रिअल लाईफ जोडी बनल्यामुळे प्रेक्षकांच्या आनंदासा पारावारच उरला नाही. मात्र आता त्यांच्या या रिअल लाईफमुळे त्यांची रिल लाईफ धोक्यात आली आहे.

मुंबई मिररने दिलेल्या एका वृत्तानुसार दीपिका पदुकोण आता पती रणवीर सिंह सोबत पुढच्या काळात सिनेमा करण्यासाठी नकार दिला आहे. एकामागोमाग येणाऱ्या 3 सिनेमांसाठी रणवीस सोबत काम करणार नसल्याचं तिने सांगितलं आहे. दीपिकाच्या नकारामुळे चाहत्यांना थोडा धक्का बसला कारण पुन्हा दीपवीर ही जोडी सिनेमात नसल्यानं चाहते थोडे नाराज झाल्याची चर्चा आहे. आपण रणवीर सोबत सलग तीन सिनेमे करण्यास का तयार नाही याचं कारण तिने सांगितलं.

हेदेखील वाचा- '83' चित्रपटाच्या सेटवर दीपिका ने रणवीरला दिला बॅट ने चोप, पाहा व्हिडियो

रिअल लाइफमधली माझी आणि रणवीरमधील केमेस्ट्री मला सिनेमातून एक्सपोज करायची नाही. त्यामुळे आम्ही एकत्र सलग तीन सिनेमांमध्ये काम करण्यास नकार दिला आहे.

तिच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यानंतर थोडी आनंद देऊन जाणारी बातमी म्हणजे दीपिका आणि रणवीर लवकरच '83' चित्रपटात एकत्र दिसणार आहे. रणवीर सिंह कपिल देव यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर दीपिका पदुकोण त्यांची पत्नी म्हणून भूमिका निभावणार आहे.