Sarfira: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा 'सरफिरा' चित्रपटाचा पोस्टर लॉंच, 'या' दिवशी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
Sarfira PC INSTA

Sarfira: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'सरफिरा'चे पहिलं पोस्टर आज समोर आले आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टरमध्ये अक्षय कुमार दमदार लूकमध्ये दिसत आहे. पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होताच, अक्षय कुमार चर्चेत आला आहे. पोस्टर सोबत अक्षय कुमार यांनी लिहले आहे की, मोठे स्वप्न पाहण्याची हिम्मत करणाऱ्या माणसाची कथा ! आणि माझ्यासाठी मी एक कथा, एक पात्र, एक चित्रपट, आयुष्यभराची संधी आहे! हेही वाचा- अजय देवगण स्टारर 'सिंघम अगेन'ची नवी रिलीज डेट जाहीर, दिवाळीत चित्रपटगृहात होणार दाखल

सरफिरा चित्रपटा संदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. चित्रपटाचा ट्रेलर 18 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. तर 12 जुलैला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. अक्षय कुमारच्या चाहत्यांनी चित्रपटासाठी उत्सुकता दाखवली आहे. चित्रपटात अक्षय पायलटच्या भुमिकेत झळकणार आहे. ‘सरफिरा’ मध्ये राधिका मदन आणि परेश रावलही, सीमा बिस्वास या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

चित्रपटाची कहाणी शालिनी उष्मादेवी पूजा तोलानी यांनी लिहली आहे. अक्षय कुमार, हाऊयसफुल 5, राउडी राठौड 2, सायको, हेरा फेरी 3, 'जॉली एलएलबी 3, वीर दौडले सात अश्या अनेक चित्रपटात महत्त्वाची भुमिका बजावणार आहे.