'IC 814' Web Series Poster | (Photo Credit- X)

नेटफ्लिक्स (Netflix) मंचावर नुकतीच प्रदर्शित झालेली "IC 814" वेब सिरीज (IC 814, Web Series Controversy) वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्स फ्लाइट 814 च्या अपहरणावर (Indian Airlines Hijacking आधारित या सिरीजमध्ये चित्रित करण्यात आलेल्या व्यक्तिरेखा आणि इतर सामग्रीवरुन आक्षेप घेतले जात आहेत. प्रामुख्याने सिरिजमध्ये वापरण्यातआलेल्या दोन अपहरणकर्त्यांना हिंदू सांकेतिक नावे भोला आणि शंकर अशी देण्यात आल्याबद्दल टीका होत आहे. ही टीका आणि आक्षेप वगळता सिरिजचे कौतुक आणि सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. विजय वर्मा अभिनीत या सिरिजमध्ये डिसेंबर 1999 च्या वेदनादायक घटनांचे चित्रण केले आहे.

X वर #BoycottNetflix ट्रेण्ड

इंडियन एअरलाइन्स विमानाटे पाच दहशतवाद्यांनी काठमांडू ते दिल्लीला जाताना विमानाचे अपहरण केले होते. त्या घटनेवर ही सिरीज बेतली आहे. अपहरणकर्त्यांसाठी हिंदू नावे वापरण्याच्या निर्णयामुळे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप होतो आहे. तसेच, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही संताप अनेकांकडून संताप व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर #BoycottNetflix हा हॅशटॅग आठवड्याच्या शेवटी X वर ट्रेंड करू लागला. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सदस्यांसह असंख्य वापरकर्त्यांनी त्यांचा असंतोष या ट्रेंडखाली व्यक्त केला. (हेही वाचा, Netflix 'IC 814' Row: 'देशाच्या भावनेला ठेच न पोहचवता गोष्टी सादर करणार' नेटफ्लिक्स ची ग्वाही)

गुन्हेगारीचे समर्थन दिल्याचा आरोप

दरम्यान, समीक्षकांनी असा युक्तिवाद केला की, या सिरीजने अपहरणकर्त्यांना सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोणातून अयोग्यरित्या चित्रित केले आणि ते हिंदू असल्याचे खोटे सुचवले. भाजपच्या सोशल मीडिया विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी या मालिकेवर दहशतवाद्यांच्या "गुन्हेगारी हेतूला कायदेशीर मान्यता" दिल्याचा आणि अपहरणासाठी जबाबदार असलेल्यांच्या खऱ्या ओळखीबद्दल दर्शकांची दिशाभूल केल्याचा आरोप केला. भारतीय विमानाच्या अपहरणासाठी भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान-समर्थित अतिरेकी गटांना जबाबदार धरले आहे. या अपहरणाच्या बाबतीत अशाच एका गटाचा नेता मसूद अझहरसह तीन इस्लामी अतिरेक्यांना सोडण्यास तत्कालीन सरकारने सहमती दर्शवली होती. हे संकट भारतीय विमान वाहतूक इतिहासातील सर्वात क्लेशकारक घटनांपैकी एक होती. अनेकांनी आरोप केला आहे की, या सिरीजमध्ये या घटनेचे चुकीचे चित्रण केले आहे.

नेटफ्लिक्सकडून स्पष्टीकरण

दरम्यान, देशभरात उमटत असलेल्या प्रतिक्रिया आणि वादावर, Netflix च्या उपाध्यक्षा मोनिका शेरगिल यांनी एक निवेदन जारी केले. त्यांनी स्पष्ट केले की, मालिकेत वापरलेली कोड नावे वास्तविक अपहरणाच्या वेळी वापरल्या गेलेल्या कोडचे प्रतिबिंब आहेत. "इंडियन एअरलाइन्स फ्लाइट 814 च्या 1999 च्या अपहरणाबद्दल अपरिचित प्रेक्षकांच्या फायद्यासाठी, अपहरणकर्त्यांची खरी आणि कोड नावे समाविष्ट करण्यासाठी सुरुवातीचे अस्वीकरण अधोरेखीत केले गेले आहे. माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर शेरगिल यांनी निवदेन जारी केले आहे.

सिरीजचा प्रोमो X वर अपलोड

IC 814 बद्दल

अनुभव सिन्हा दिग्दर्शित, "IC 814" हे 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइट 814, एअरबस A300 च्या अपहरणाचे नाट्यमय वर्णन आहे. 179 प्रवासी आणि 11 क्रू सदस्यांसह 190 लोकांना घेऊन जाणारे हे फ्लाइट भारतात प्रवेश केल्यानंतर लगेचच अपहरण करण्यात आले. हवाई क्षेत्र अपहरणकर्त्यांची नंतर पाकिस्तानस्थित दहशतवादी गट हरकत-उल-मुजाहिद्दीनचे सदस्य म्हणून ओळख पटली.

IC 814 सिरीजमधील कलाकार

अभिनेते विजय वर्मा, नसीरुद्दीन शाह आणि पंकज कपूर यांच्यासह उत्कृष्ट कलाकारांचा या सिरीजमध्ये समावेश आहे.