अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांचा धमाकेदार 'वॉर' (WAR) चित्रपट नुकतान प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. मात्र आता वॉर चित्रपटातील कलाकारांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. वॉर प्रदर्शित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी इंटरनेटवर लीक करण्यात आला आहे. असे सांगितले जात आहे की, लीक झाल्यानंतर धडाधड युजर्सकडून वॉर चित्रपट डाऊनलोड करण्यात आला आहे. या प्रकारामुळे चित्रपट निर्मात्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
तर चित्रपटांची पायरसी करणाऱ्या तमिळ रॉकर्सवर (Tamil Rockers) वॉर चित्रपट लीक करण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार, तमिळ रॉकर्सवर चित्रपटाची HD प्रिंट लीक झाली आहे. मात्र या वेबसाईटवर सरकारने बंदी घातली होती. तरीही युजर्सकडून प्रॉक्सी सर्वरच्या माध्यमाचा उपयोग करुन पायरी चित्रपट डाऊनलोड करत आहेत. यामुळे चित्रपट निर्मात्यांना फटका बसतो.(चित्रपटांची पायरसी करणाऱ्या Tamil Rockers वेबासाइटला ब्लॉक करण्याचा दिल्ली हायकोर्टाचा आदेश)
यापूर्वीसुद्धा ऋतिक रोशन यांचा एक सस्पेंस चित्रपट लीक करण्यात आला होता. यावर ट्वीट करत ऋतिकने असे म्हटले की, मला लोकांना वैयक्तिक एक संदेश द्यायचा असून आम्ही कलाकार चित्रपटासाठी खुप मेहनत करुन वॉर हा चित्रपट प्रेक्षकांना पाहण्यासाठी प्रदर्शित करतो. मात्र चित्रपट पाहताना त्याचा सस्पेंस काय आहे हे सांगू नका. यामुळे अन्य प्रेक्षकसुद्धा चित्रपट पाहण्यासाठी राजी होत नाहीत.
'वॉर' चित्रपटाची कमाई बॉक्स ऑफिसवर जवळपास 75 करोड रुपये झाली आहे. तसेच वॉर चित्रपटाला 3800 स्क्रिन मिळाल्या आहेत. तर 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाच्या कामाईलासुद्धा वॉर चित्रपटाने पाठी टाकले आहे.