चित्रपटांची पायरसी करणाऱ्या Tamil Rockers वेबासाइटला ब्लॉक करण्याचा दिल्ली हायकोर्टाचा आदेश
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court)  इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर्स (ISPs) यांना तमिल रॉकर्स (Tamil Rockers), EZTV, कॅटमूव्हीज आणि लाइमटॉरेंट यांसारख्या वेबासाइटला सेवा पुरवणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या संकेतस्थळांवर चित्रपटांनी परवानगी नसताना दाखवणे आणि वार्नर ब्रॉस, युनिव्हर्सल किंवा नेटल्फिक्स यांसारख्या टीवी सिरिजचे प्रदर्शित केल्याचा आरोप लगावण्यात आला आहे. त्यामुळे न्यायमुर्ती संजीव नरुला यांनी ISPs यांना आदेश दिले आहेत की पायरसी करणाऱ्या या वेबसाइटला ब्लॉक करावे.

US मधील एंटरनेमेंट कंपनी वार्नर ब्रॉस यांनी दाखल केलेल्या याचिकेवरुन कोर्टाने हा निर्णय घेतला आहे. या याचिकेत असे म्हटले आहे की, तमिल रॉकर्स ही वेबसाईट आमचा ओरिजनल कंटेट होस्ट, स्ट्रीम, रिप्रोड्युस आणि डिस्ट्रिब्युशन करत असून तो लोकांपर्यंत पोहचवत आहे. तर वॉर्नर यांची ही वेबसाइट असल्याचे दर्शवत नागरिकांना तमिल रॉकर्स भुलवत आहेत.

तमिल रॉकर्स ही वेबसाईट चित्रपटांची पायरसी करण्यात प्रथम असून ते आपल्या नव्याने प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची कॉपी प्रेक्षकांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन देतात. आता पर्यत या वेबसाइटच्या माध्यमातून बिग बजेट सिनेमे लीक केले गेले आहेत. पायरसी केलेल्या चित्रपटांचा मोठा फटका निर्माते आणि प्रोडक्शन हाऊसला बसतो.(Porn Video ऑनलाईन पाहता? सावधान! ब्लॅकमेल करण्यासाठी केलं जातंय व्हिडिओ रेकॉर्डिंग)

जून महिन्यात प्रदर्शित झालेला शाहिद कपूर याचा कबीर सिंह हा चित्रपट सुद्धा तमिल रॉकर्सवर लीक करण्यात आला होता. यापूर्वीसुद्धा पायरसी करणाऱ्या अन्य वेबसाइट विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तरीही अजून चित्रपटांची पायरसी करण्याचा प्रकार थांबलेला नाही.