Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

इंटरनेटवर पॉर्न व्हिडिओ (Porn Video) पाहण्याची जर तुम्हालाही सवय असेल तर, सावधान. ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. कारण, इंटरनेटवर पॉर्न व्हिडिओ पाहताना तुमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाऊ शकते. सायबर सिक्यॉरिटी एक्सपर्ट्स ने एका 'स्पैमबॉट' (Spambot) चा शोध लावला आहे. जो युजर्सला ऑनलाईन पॉर्न (Online porn) पाहताना शुटींग करु शकतो. त्यानंतर या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून हे स्पॅमबॉट सेक्सुअल ब्लैकमेलिंग किंवा सेक्सटॉर्शन करण्याचे काम करतो. हा स्पॅमबॉट एकप्रकारचा प्रोग्रामच आहे. ज्याला इंटरनेटच्या माध्यमातून ईमेल अॅड्रेस शोधणे आणि त्यांना नको असलेले मेल पाठवण्यासाठी डिझाईन केलेले असते.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पॅमबॉट चे नाव Varenyky असे आहे. त्याचा शोध फ्रान्समध्ये लागला. एका स्मार्टफोन प्रमोशन्ससाठी काही स्पॅम मेल पठविण्यात आले होते. तेव्हा Varenyky चा उलघडा झाला. दरम्यान, Varenyky च्या एक नव्या व्हेरियंटने सेक्सटॉर्शन सुरु केल्याची माहिती आहे. ज्यात दावा करण्यात आला आहे की, हॅकर व्हायरसच्या माध्यमातून यूजर्सच्या कॉम्प्यूटरचा अॅक्सेस घेत आहेत. त्यानंतर यूजर्स अॅडल्ट वेबसाईटवर जाताच आणि पॉर्न पाहण्यास सुरुवात करताच हा बॉट यूजर्सचे रेकॉर्डिंग करतो. काही अहवालांमध्येही म्हटले आहे की, व्हिक्टिम यूजर्सची पॉर्नोग्राफीमध्ये एक खास आवड असते. ती ओळखून हॅकर युजर्सच्या कॉम्प्यूटरचा ताबा घेतात.

दरम्यान, युजर्सची माहिती घेतल्यानंतर हॅकर्सकडून त्याला एक मेल जातो. ज्यात आपला एक व्हिडिओ बनविण्यात आला आहे. त्यात तुम्ही पॉर्न व्हिडिओ पाहाताना दिसत आहात, असे सांगितलेले असते. तसेच, अर्ध्य स्क्रिनवर ब्राऊजरवर पाहिला जाणारा कंटेंट किंवा पॉर्न तर उर्वरीत स्क्रिनवर वेबकॅमने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ दिसतो. तसेच, मेलमध्ये असेही म्हटलेले असते की, युजर्सची कॉन्टैक्ट लिस्ट, पिक्चर्स, पासवर्ड्स, बँक अकाउंट डेटा आणि बाकी डिटेल्सही आमच्याकेड आहेत. त्याची एक कॉपी तयार आहे. त्यामुळे एका विशिष्ट खात्यावर 750 यूरो (सुमारे 60,000 रुपये) इतकी रक्कम जमा केली तरच तुमची सुटका होईल. अशा प्रकारे हे हॅकर्स युजर्सला ब्लॅकमेल करतात. (हेही वाचा, XXX, Porn Video ऑनलाईन पाहता? सावधान! Google, Facebook आपल्यावर ठेवतंय बारीक नजर)

दरम्यान, विशिष्ट रक्कम येत्या 72 तासांमध्ये जर आमच्या अकाऊंटवर पाठवली नाही तर, तुमची ही सर्व अश्लिल माहिती तुमच्या नातेवाईक, मित्र आणि इतरांना पाठवली जाईल. तसेच, सोशल मीडिया जसे की, फेसबुक, ट्विटर आणि इतर प्लॅटफॉर्मवरही ही माहिती अपलोड केली जाईल. या मेलमध्ये असेही सांगितलेले असते की, आता तुमचा पासवर्ड बदलून किंवा डिलिट करुन काही उपयोग नाही. तसेच कॉम्पूटरही बदलून काही उपयोग नाही. कारण तुमचा डेटा एका रिमोट सर्वरवर सेव करण्यात आला आहे. तुम्ही जर आमच्या अटींवर पैसे द्यायला तयार असाल तर, 'Yas' असे लिहा. युजर्सने 'Yas' असा प्रतिसाद दिल्यानंतर त्याला समोरुन 6 महत्त्वपूर्ण कॉन्टॅक्ट पाठवले जातात. पैशांच्या ऑफरमध्ये काहीही तडोज केली जाणार नाही. त्यामुळे तुमचा आणि आमचा वेळ फुकट वाया घालवू नये असेही, या ईमेलमध्ये म्हटलेले असते.