XXX, Porn Video ऑनलाईन पाहता? सावधान! Google, Facebook आपल्यावर ठेवतंय बारीक नजर
Google Facebook Tracking Users | Image only representative purpose (Photo credit: pxhere)

पॉर्न व्हिडिओ (Porn Video) किंवा पॉर्न चित्रपट चोरीछुपे पाहण्याची तुम्हाला सवय अथवा व्यसन आहे काय? तुम्हाला जर असे वाटत असेल की, तुम्ही पाहात असलेले ऑनलाईन पॉर्न (Online Porn) हे तुम्ही केवळ एकांतात पाहता. तुमच्या आजूबाजूला चिटपाखरुही नाही. तर, तो तुमचा गैरसमज आहे. इंटरनेट आणि गूगलच्या दुनियेत हे शक्य नाही. कारण, तुम्ही पाहात असलेल्या ऑनलाईन पॉर्न व्हडिओ (Online Porn Video) , चित्रपटांवर गूगल (Google) आणि फेसबूक (Facebook) बारीक लक्ष ठेऊन असतात. त्यामुळे ऑनलाईन पॉर्न पाहणाऱ्या युजर्सचा ते डेटा तयार करतात. हा डेटा ते केवळ तयारच करत नाहीत तर तो त्या इतर टेक कंपन्यासोबत शेअरही करतात. यूजर्सची ऑनलाईन अॅक्टीविटी ट्रॅक करण्यासाठी असे केले जाते. इतकेच नव्हे तर, तुम्ही तुमच्या कॉम्प्यूटरवर Incognito मोडवर पॉर्न पाहात असला तरीही ते ट्रॅक केले जाते.

अहवालात धक्कादायक माहिती

मायक्रोसॉफ्ट आणि यूनिवर्सिटी ऑफ पेनसिलवेनिया ऐंड कार्नेगी मेलॉन यांच्या संशोधकांनी संयुक्तरित्या केलेल्या एका सर्वे अहवालात म्हटले आहे की, त्यांनी जगभरातून सुमारे 22,484 अडल्ट कॉन्टेंट प्रसारीत करणाऱ्या संकेतस्थळांना स्कॅन केले आहे. या सर्व साईट्स आपला टेटा पुढे फॉर्वर्ड करत आहेत. या अहवालात अभ्यासकांनी म्हटले आहे की, यातील सुमारे 93 टक्के संकेतस्थळं अशी आहेत जी त्रयस्त कंपन्यांच्या सुमारे 7 नावांनी (डोमेन) युजर्सचा डेटा शेअर करते. अहवालात असेही म्हटले आहे की, केवळ 17 टक्के अडल्ट संकेतस्थळं अशी आहेत जी एनक्रिप्शन वापर करतात.

गूगल आणि फेसबूकही करतंय युजर्सला ट्रॅक

दरम्यान, 93 टक्के संकेतस्थळांपैकी 74 टक्के पॉर्न बेबसाईट (संकेतस्थळ) अशा होत्या ज्या गूगल आणि त्यांच्या इतर कंपन्याच ट्रॅक करत होत्या. सॉप्टवेअर डेव्हलपर कंपनी ऑरकल हीसुद्धा सुारे 24 टक्के पॉर्न साईट्सना ट्रॅक करताना अभ्यासकांना आढळून आले. इतकेच नव्हे तर लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेली सोशल नेटवर्कींग मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक हे सुद्धा प्रति 10 युजर्समागे 1 युजर्सचे पॉर्न साइट ट्रॅकींग करत असल्याचे रिसर्चर्सना आढळून आले. (हेही वाचा, नवी मुंबई: XXX व्हिडिओ पाहण्यासाठी दोन मुलींवर जबरदस्ती; आरोपीला अटक)

दरम्यान, कंपन्यांकडून युजर्सच्या ट्रॅक केलेल्या डेटाचे पुढे काय होते, हे अद्याप पुढे आले नाही. मात्र, असा दावा केला जात आहे की, या कंपन्या एखादे एडवरटाइज मॉडेल तयार करण्यासाठी या कंपन्या हा डेटा वापरत असाव्यात.