पालघर: लॉजवरील खोलीत कोंडून एक्स गर्लफ्रेंडवर रात्रभर बलात्कार; प्रियकराला अटक
Palghar Rape Case | (Photo credit: archived, edited, representative image)

पालघर (Palghar) जिल्ह्यातील बोईसर (Boisar) परिसरात एका तरुणीवर लॉजवरील खोलीत कोंडून रात्रभर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पालघर पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली आहे. फैजल सैफी ( Faisal Saifi) (वय - 23 वर्षे) असे आरोपीचे नाव असून, पीडिता त्याची एक्स गर्लफ्रेंड (Ex Girlfriend) असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. ही घटना 10 आणि 11 जानेवारीच्या रात्री घडली.

प्राप्त माहितीनुसार, पीडित तरुणी 21 वर्षांची आहे. आरोपी फैजल याच्यासोबत ती 2017 पासून रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, मधल्या काळात दोघांमध्ये ब्रेकअप झाले होते. मात्र, फैजल सैफी याने या तरुणीसोबत रिलेशनशिपमध्ये असतानातील खासगी क्षणांचे व्हिडिओ चित्रिकरण केले होते. हे चित्रिकरण केल्याची कोणतीही माहिती पीडित तरुणीला नव्हती. मात्र, कालांतराणे या व्हिडिओ चित्रकरणाच्या माध्यमातून दबाव टाकून तो तिला ब्लॅकमेल करीत असे. तसेच, आपल्यासोबत शरीसंबंध ठेवले नाहीत तर हे व्हिडिओ प्रसिद्ध करेन अशी तो तिला धमकी देत असे. पीडितेने शरीसंबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त व्हावे यासाठी सतत तिला ब्लॅकमेल करीत असे. (हेही वाचा, नवी मुंबई: XXX व्हिडिओ पाहण्यासाठी दोन मुलींवर जबरदस्ती; आरोपीला अटक)

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खासगी क्षणांचे चित्रिकरण केलेली व्हिडिओ क्लिप डिलीट करण्याचे कारण देत आरोपी फैजल सैफी याने पीडितेला पालघर येथील बोईसर परिसरातील लॉजवर बोलावले. तेथे आरोपीने पीडितेला कोंडून ठेवले आणि तिच्यावर रात्रभर बलात्कार केला. अखेर काही काळाने खोलीतून सूटका झाल्यानंतर पीडितेने स्थानिक पोलीस स्टेशन गाठले आणि 12 फेब्रुवारीच्या सकाळी आरोपीविरोधात तक्रार दिली. बलात्कार, अपहरण, कोंडून ठेवणे अशा विविध गुन्ह्यांसाठी भारतीय दंड संहितेत असलेल्या विविध कलमांनुसार पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, त्याला अटकही केले आहे.