Holi 2021: सुशांत सिंह राजपूत आणि जॅकलिन फर्नांडिज यांचा होळीतला भन्नाट डान्स पाहिलात का? व्हिडिओ पाहून होतील आठवणी ताज्या
Sushant Singh Rajput, Jacqueline Fernandez (Phot0 Credit: Instagram)

Happy Holi 2021: संपूर्ण देशात धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार होळीचा सण आला आहे. प्रत्येकजण आपल्या प्रियजनांसोबत हा उत्सव साजरा करण्याची तयारी करत आहे. दरम्यान, बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंहची (Sushant Singh Rajput) त्याच्या चाहत्यांनी आठवण काढली आहे. होळी सणाच्या निमित्ताने सोशल मीडियावर (Social Media) सुशांत सिंहचे काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. मात्र, सुशांतने गेल्या वर्षी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिज (Jacqueline Fernandez) हिच्यासोबत केलेल्या भन्नाट डान्सचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. सुशांतच्या चाहत्यांकडून या व्हिडिओला मोठी पसंती दर्शवली जात आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत सुशांत सिंह राजपूत आणि जॅकलिन फर्नांडिज होळीच्या निमित्ताने एका कार्यक्रमाल हजेरी लावली होती. या कार्यक्रमात सुशांत सिंह आणि जॅकलीन फर्नांडीज रंग बरसे या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव केला जात आहे. हे देखील वाचा- Aamir Khan पाठोपाठ R Madhavan कोरोना झाल्यानंतर '3 इडियट्स'चा सहकलाकार शर्मन जोशी ने आर माधवनच्या मजेशीर पोस्टला दिली तितकीच भन्नाट प्रतिक्रिया

व्हिडिओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by blogger (@blogger_1984)

सुशांत सिंह राजपूतने 14 जून 2020 रोजी मुंबईच्या वांद्रे येथील राहत्या गळफास लावून आत्महत्या केली होती. सुशांतच्या अचानक जाण्याने बॉलिवूडला मोठा धक्का बसला होता. सुशांतच्या मृत्यु संदर्भात अनेक तर्क वितर्क लावले जात असून याप्रकरणी सीबीआय चौकशी करत आहेत.