3 Idiots (Photo Credits: Twitter)

काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) याला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्यापाठोपाठ त्याचा '3 इडियट्स' (Three Idiots) मधील सहकलाकार आर माधवन याला देखील कोरोनाची लागण झाली. मात्र आर माधवनने (R Madhavan) याची माहिती आपल्या चाहत्यांना सोशल मिडियाद्वारे मजेशीर अंदाजात दिली आहे. त्याने थ्री इडिट्स चित्रपटाचा उल्लेख आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली. त्याच्या या ट्विटवर त्याचा या चित्रपटातील सहकलाकार शर्मन जोशीने (Sharman Joshi) देखील तितकीच भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.

शर्मन जोशीने आर माधवनला भन्नाट उत्तरात म्हटले आहे, 'मला आशा आहे की मी तुमच्या क्लबमध्ये सामील होणार नाही… पण मॅडी तू खान लिहिलं आहेस. फनी आहे' या आशयाचे ट्वीट शर्मन जोशीने केले आहे. त्यावर आर माधवनने उत्तर देत 'हाहाहा… हो भाई. तू सुरक्षित आणि निरोगी रहा' असे म्हटले आहे.हेदेखील वाचा- Aamir Khan पाठोपाठ R Madhavan ला देखील Covid-19 ची लागण; 3 Idiots च्या मजेदार अंदाजात ट्वीट करत दिली माहिती

काय होते आर माधवनचे ट्विट:

'फरहानने नेहमीच रँचोला फॉलो केले आहे आणि व्हायरस नेहमी आमच्या मागेच असतो. पण त्याने आम्हा दोघांनाही पकडले आहे. पण ऑल इज वेल आणि आम्ही लकरच बरे होऊ. ही अशी जागा आहे जिकडे राजू पोहोचू नये असे आम्हाला वाटते' या आशयाचे मजेशीर ट्वीट करत 3 इडियट्समधील पोस्टर शेअर केले होते.

आमीर खान आणि आर माधवन थ्री इडियट्स सिनेमामध्ये सहकलाकार होते. यामध्ये आमीरच्या भूमिकेचं नाव रॅन्चो तर माधवनच्या भूमिकेचं नाव फरहान होतं. त्यांच्यासोबत अभिनेता शर्मन जोशी 'राजू' ची भूमिका साकारत होता तर बोमन इरानी 'वायरस' च्या भूमिकेत होता.