Aamir Khan पाठोपाठ R Madhavan ला देखील Covid-19 ची लागण; 3 Idiots च्या मजेदार अंदाजात ट्वीट करत दिली माहिती
आर माधावन । Photo Credits: Twiiter/ R Madhvan

मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना रूग्णांच्या संख्येत पुन्हा उच्चांकी वाढ पहायला मिळत आहे. दरम्यान कोरोना संसर्ग रोखण्यासाठी एकीकडे लसीकरण मोहिम राबवली जात आहे तर दुसरीकडे कडे टेस्टिंग वाढवल्याने रूग्णसंख्येमध्येही मोठी वाढ पहायला मिळत आहे. आता अनेक सेलिब्रिटीज देखील कोरोना पॉझिटिव्ह होत असल्याचं समोर आलं आहे. काल (24 मार्च) बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) कोरोनाच्या विळख्यात आल्यानंतर आता अभिनेता आर माधवन  (R Madhavan)कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. माधवनने देखील त्याच्या या आजारपणाची गोष्ट सिनेमा 3 इडियट्स (3 Idiots) सोबत जोडत एक मजेशीर पोस्टसह ट्वीट केले आहे.

आर माधवनने ट्वीट केलेली खास पोस्ट अशी आहे- 'फरहान ला तर रॅंचोला फॉलो करायलाच पाहिजे. 'वायरस' तर आमच्या मागे कायमच होता. पण यावेळेस त्याने आम्हांला पकडलं आहे. पण ऑल इज वेल. लवकरच कोविड देखील खड्ड्यात जाईल. ही एक अशी गोष्ट आहे जिथे आम्हांला 'राजू'ला येऊ द्यायचं नाहीए. तुमच्या सार्‍यांच्या प्रेमासाठी धन्यवाद. कोविड मधून चांगल्या प्रकारे बाहेर पडतोय.

आर माधवन ट्वीट

आमीर खान आणि आर माधवन थ्री इडियट्स सिनेमामध्ये सहकलाकार होते. यामध्ये आमीरच्या भूमिकेचं नाव रॅन्चो तर माधवनच्या भूमिकेचं नाव फरहान होतं. त्यांच्यासोबत अभिनेता शर्मन जोशी 'राजू' ची भूमिका साकारत होता तर बोमन इरानी 'वायरस' च्या भूमिकेत होता.

दरम्यान आर माधवन ने तो कोविड पॉझिटिव्ह झाल्याची माहिती देताना त्याने दाखवलेली सकारात्मकता वाखाण्याजोगी आहे. त्याच्या अनेक चाहत्यांनी माधवनच्या या मजेशीर ट्वीट्चं कौतुक करत आजारपणावर लवकर मात करण्यासाठी प्रार्थना केल्या आहेत.