JNU आंदोलनाला पाठिंबा दर्शवणाऱ्या दीपिका पादुकोण हिच्या जाहिरातींना फटका, मोठे नुकसान होण्याची शक्यता
दीपिका पादुकोण (Photo Credits: Twitter)

बॉलिवूड कलाकारांना राजकरणात पाठिंबा दर्शवणे काही वेळेस महागात पडते. तर यामध्ये स्वरा भास्कर असो किंवा सुशांत सिंह सारखे कलाकार असोत. यामुळे त्यांना त्यांच्या पुढील प्रोजेक्टबाबत अडथळे येतात. त्यात आता दीपिका पादुकोण हिचे सुद्धा नाव चर्चेत आले आहे. नुकत्याच जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर हल्ला केल्यानंतर दीपिका हिने दिल्लीत उपस्थिती लावत त्यांना पाठिंबा दर्शवला होता. त्यावेळी दीपिकाने विद्यार्थी संघाची अध्यक्ष आयशी घोष हिची भेट घेतली. याच कारणास्तव दीपिकाच्या विरोधात टीका करण्यात आली. मात्र आता दीपिकाच्या जाहिरातींना सुद्धा फटका बसला असून मोठ्या ब्रॅन्ड्सनी तिच्या जाहिराती दाखवणे सुद्धा कमी केले आहे. त्यामुळे दीपिकाला मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

इकोनॉमिक्स टाईम्स यांच्या वृत्तानुसार, दीपिकाच्या जेएनयू येथील दौऱ्यानंतर काही ब्रॅन्ड्सनी तिच्यापासून दूर राहण्यास सुरुवात केली आहे. काही ब्रॅन्ड्सनी असे सांगितले की, दीपिकाची जाहिरात दाखवणे आम्ही थांबवले आहे. हे सर्वकाही थोड्या काळासाठी असून वाद पूर्णपणे थंड होईपर्यंत सुरु राहणार आहे. सेलिब्रेटी मॅनेजर्स यांचे असे म्हणणे आहे की, दीपिकासह अन्य कलाकारांनी सुद्धा राजकरणात सहभाग घेतल्यानंतर त्यांना काही गोष्टींबाबत समस्या सहन कराव्या लागणार असल्याची शक्यता आहे. कारण ब्रॅन्ड्स वादविवादापासून दूर राहत सुरक्षित रुपात कार्य करण्यावर विश्वास ठेवतात.(Chhapaak HD Full Movie Leaked on TamilRockers for Free Download & Watch Online: दीपिका पदुकोण चा नवा चित्रपट ठरला ऑनलाईन पायरसीचा शिकार)

दरम्यान जेएनयू दौऱ्यानंतर तिचा चित्रपट 'छपाक' पाहू नका असे अपील सुद्धा काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियातून करण्यात आले होते. इंटरनेटवर सुद्धा चित्रपटाच्या विरोधात वाईट पब्लिसिटी करण्यात आली. एक माडियाच्या रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले की, आम्हाला ब्रॅन्डकडून असे म्हटले की दीपिका संबंधित प्रचार करणे दोन आठवडे बंद करा. दीपिका हिचे नेटवर्थ 103 करोड असून ती 23 ब्रॅन्डची अॅम्बासेटर आहे.