Chhapaak HD Full Movie Leaked on TamilRockers for Free Download & Watch Online: दीपिका पदुकोण चा नवा चित्रपट ठरला ऑनलाईन पायरसीचा शिकार
Deepika Padukone Look In Chhapaak Film (Photo Credits: Instagram)

दीपिका पादुकोण आणि विक्रांत मस्से यांच्या छपाक चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात जाऊन दीपिका पदुकोण हिने जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली. मात्र विरोधी गटाने छपाकवर बहिष्कार घालण्याचा प्रयत्न केला, एवढेच नव्हे तर ट्विटरवरही दीपिकावर जोरदार टीका देखील करण्यात आल्या. निषेध होत असूनही आता हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगल्या नोटवर एंट्री केली आहे. परंतु, छपाक प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी (Chhapaak Free Download & Watch Online) पायरसीचा बळी पडला आहे.

आता हा चित्रपट TamilRockers  (Chhapaak HD Full Movie) वर ऑनलाईन लीक झाला आहे. तामिळ रॉकर्स एक पायरसी वेबसाइट आहे जी ऑनलाइन चित्रपट पायरसीसाठी कुप्रसिद्ध आहे. परंतु धक्कादायक बाब म्हणजे छपाक रिलीझच्या दिवशीच काही तासांतच लीक झाला आहे. TamilRockers वर यापूर्वी टायगर श्रॉफ- हृतिक रोशनचा वॉर, अक्षय कुमारचा हाऊसफुल 4, अमिताभ बच्चन आणि चिरंजीवीचा सई रा नरसिम्हा रेड्डी, आयुष्मान खुरानाचा चित्रपट बाला आणि नुकताच प्रदर्शित झालेला ड्वेन जॉनसन आणि केविन हार्ट यांना जुमानजी: द नेक्स्ट लेवल, आणि सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा स्टारर दबंग 3 यासारख्या चित्रपट देखील लीक झाले होते.

Chhapaak vs Tanhaji Box Office First Day Collection: 'तानाजी' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुरळा; पहिल्या दिवशी 15 कोटींची कमाई करत 'छपाक'ला टाकलं मागं

बॉलिवूड

हा चित्रपट आता ऑनलाईन उपलब्ध झाल्यामुळे बॉक्स-ऑफिसवर या चित्रपटाचे भवितव्य काय असेल असा प्रश्न पडतो. दरम्यान, मेघना गुलजार यांच्या दिग्दर्शनाने बॉक्स ऑफिसवर 4.77 कोटींची कमाई केली आहे. तर अजय देवगण, सैफ अली खान आणि काजोल स्टारर तन्हाजी: द अनसंग वॉरियर देखील 10 जानेवारी, 2020 रोजीच प्रदर्शित झाला आहे.