Chhapaak vs Tanhaji Box Office First Day Collection: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोनचा (Deepika Padukone) बहुचर्चित सिनेमा 'छपाक' आणि अभिनेता अजय देवगण याचा 'तानाजी' (Tanhaji: The Unsung Warrior) हा चित्रपट 10 जानेवारीला प्रदर्शित झाला. एकाच दिवशी हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाल्याने बॉक्स ऑफिसवर कोणाची जास्त कमाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. शुक्रवारी 'छपाक' चित्रपटाने 5 कोटी रुपयांची कमाई केली तर अजय देवगणच्या तानाजी चित्रपटाने 15 कोटींची कमाई केली. तानाजीने छपाक चित्रपटाला मागे टाकले आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी आपल्या ट्विट हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे. यात त्यांनी छपाक चित्रपटाने पहिल्या दिवशी 5 कोटींची कमाई केली असल्याचे सांगितले आहे. तसेच या आठवड्याच्या शेवटपर्यंत 'छपाक' सिनेमाची कमाई आणखी वाढेल, असेही त्यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - Tanhaji: The Unsung Warrior Meta Review- अजय देवगण चा तान्हाजी नक्की आहे तरी कसा?)
#Chhapaak 's All-India Day 1 Early Estimates Nett is around ₹ 5 Crs..
Expected to grow over the weekend..
— Ramesh Bala (@rameshlaus) January 11, 2020
@ajaydevgn s #TanhajiTheUnsungWarrior collects ₹15Cr. Appox. on Day1
— RAJ BANSAL (@rajbansal9) January 10, 2020
शुक्रवारी छपाक बरोबरचं तानाजी चित्रपटही प्रदर्शित झाला. तानाजी चित्रपटाने छपाकला मागे टाकत पहिल्याच दिवशी 15 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तानाजी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक राज बन्सल यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे. प्रदर्शनापूर्वी तानाजी चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 10 कोटींची कमाई करणार असल्याचे निष्कर्ष लावले जात होते. मात्र, हा अंदाज चुकीचा ठरवत तानाजी चित्रपटाने पहिल्याचं दिवशी बक्कळ कमाई केली आहे.