Deepika - Ranveer wedding : दीपिका आणि रणवीर सिंग इटलीत विवाहबंधनात अडकले !
दीपिका-रणवीर (Photo Credits: File Photo)

इटलीमध्ये लेक कोमो परिसरात एका खास व्हिलामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग विवाहबंधनामध्ये अडकले आहेत. दीपिका आणि रणवीर यांच्या लग्नाचे फोटो शेअर करण्यात आलेले नाही. मात्र ते विवाहबंधनात अडकल्याची माहिती समोर आली आहे.  अगदीच मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा विवाहसोहळा पार पडला आहे. दीपिका पदुकोणच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून  फोटो शेअर करण्यात आला दीप वीर च्या लग्नातील पहिला ऑफिशियल फोटो 

जितेश पिल्लई यांनी ट्विटरच्या माध्यमातून या जोडीला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 14 आणि 15 नोव्हेंबर असे दोन दिवस रणवीर सिंग आणि दीपिका पदूकोणचा विवाहसोहळा दोन पद्धतीने पार पडणार आहे. आज बेंगलोरी स्टाईलने लग्न पार पडले आहे. Deepika-Ranveer Wedding: . दीपिका-रणवीरच्या लग्नसोहळ्याचे फोटो 'या' खास कारणासाठी इंटरनेटवर नाही दिसणार

28 नोव्हेंबरला मुंबई ग्रॅन्ड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये रिसेप्शन होणार आहे. बॉलिवूड जगतातील दिग्गज मंडळी या रिसेप्शनला हजेरी लावणार आहेत. रिसेप्शनला गिफ्ट न आणता उपस्थितांनी चॅरिटीसाठी डोनेशन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राम - लीला हा संजय लीला भंसाळी दिग्दर्शित सिनेमामध्ये रणवीर आणि दीपिका यांनी एकत्र काम केले. पुढे बाजीराव मस्तानी आणि यंदाच्या सुपरहीट सिनेमांपैकी एक असलेल्या पद्मावत सिनेमामध्येही दीपिका आणि रणवीर एकत्र होते. सुमारे 5 वर्षांहून अधिक काळ रिलेशनशीपमध्ये असलेली दीपिका आणि रणवीर सिंग ही जोडी आज विवाहबंधनात अडकली आहे.