दीपिका पदुकोण-रणवीर सिंग (Photo Credit : Twitter)

बॉलिवूडचे बाजीराव-मस्तानी म्हणजे अर्थातच दीपिका-रणवीरचा विवाहसोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. रामलीला सिनेमापासून सुरु झालेला ओळख-मैत्री-प्रेम हा प्रवास आता लग्नापर्यंत येऊन पोहचला आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर शेअर करुन खुद्द दीपिका-रणवीरने ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली. 14-15 नोव्हेंबरला विवाहबद्ध होत असलेले हे कपल लग्नासाठी इटलीला रवाना देखील जाले. इटलीत विवाहबद्ध झाल्यानंतर 28 नोव्हेंबरला मुंबईत ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. शाही विवाह सोहळ्यासाठी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग इटलीला रवाना

दीपिका-रणवीरच्या रिसेप्शनची खास पत्रिका सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

#deepikapadukone #ranveersingh #invitationswedding

A post shared by ana pepo (@faresblahabieb) on

 

विवाहसोहळ्यासाठी इटलीला रवाना होण्यापूर्वी दीपिका-रणवीरने संजय लिला भन्साली, शाहरुख खान, करण जोहर यांची भेट घेऊन त्यांना लग्नाचे आमंत्रण दिले.

विवाहसोहळ्यात काही नेमके पाहुणे उपस्थित राहतील. पण रिसेप्शनला बॉलिवूड स्टार्सची मांदीयाळी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 'राम -लीला','बाजीराव -मस्तानी आणि 'पद्मावत' या सुपरहीट सिनेमांमध्ये दीपिका-रणवीरने एकत्र काम केले आहे. पाच-सहा वर्षांच्या दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला.